infectious disease sakal media
मुंबई

ठाण्याला साथीच्या आजाराचा धोका; औषधफवारणी करण्याचे दिले आदेश

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे शहरात मलेरियाचा प्रादुर्भाव (Malaria infection) वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यात तब्बल २२ मलेरिया रुग्णांची रुग्णांची नोंद पालिकेच्या (Thane municipal corporation) आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात साथीचे आजार उद्‍भवू नयेत यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (dr vipin sharma) यांनी प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत धूर, औषधफवारणी करण्याचे आदेश दिले आहेत. पाण्यामुळे साथीचे आजार (Infectious disease) पसरू नयेत यासाठी प्रत्यक्ष घरी जाऊन पाण्याची तपासणी करण्यात येत आहे.

ठाणे पालिका क्षेत्रामध्ये फेब्रुवारी २०२२ मध्ये डेंगीचा एक, तसेच मलेरियाचे २२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच आरोग्य विभागाच्या वतीने शहरात गृहभेटी देऊन तपासणी करण्यात येत असून ४२ हजार ११७ घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार ८२ घरे दूषित आढळून आली. तसेच ५९ हजार २५१ कंटेनरची तपासणी केली असता त्यापैकी एक हजार ३६७ कंटेनर दूषित आढळून आले. यापैकी ४०२ दूषित कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले; तर ८२६ दूषित कंटेनर रिकामे करून काही कंटेनरमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले आहेत.

पालिकेकडून औषधफवारणी

महापालिका कार्यक्षेत्रात ९० हॅण्डपंप, १० ट्रॅक्टर्स, ७ ई-रिक्षा, ८ बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रांत एक हजार ६२७ ठिकाणी औषधफवारणी आणि ४० धूरफवारणी हॅण्डमशीनद्वारे १५ हजार ५७२ ठिकाणी धूरफवारणी करण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : इचलकरंजीत घराची भिंत कोसळल्याने पाचजण जखमी

Raj Thackeray in Pune :राज ठाकरेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!

Mangalwedha News : वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकाची परभणी-कोल्हापूर सायकल यात्रा

Donald Trump: देशात आता 'स्वदेशी जागरण अभियान'; भाजपचा पुढाकार, 'ट्रम्प टॅरिफ'ला देणार उत्तर

SCROLL FOR NEXT