मुंबई

पैशाच्या वादातून मित्राची हत्‍या

CD

नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : पैशाच्या देवाणघेवाणीतून रबाळे येथील साईबाबा नगरमध्ये राहणार्‌या फिदा हुसेन उर्फ फिरोज (२६) या तरुणाने शेजारी राहणाऱ्या रोशन भारती (१६) या मुलाची निर्घृणपणे हत्या केली. आणि त्‍याचा मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी फिदा हुसेन याला अटक केली.
रोशन श्यामसुंदर भारती (१६) हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून रबाळे एमआयडीसीतील साईबाबा नगरमध्ये राजकुमार भारती या काकांकडे राहण्यास होता. तसेच रबाळे एमआयडीसीतील कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होता. त्याच्या शेजारी राहणारा फिदा हुसेन हाही रोशनसोबत कामाला जात होता. त्यामुळे दोघेही चांगले मित्र झाले होते. त्‍यांना गांजाचे व्यसनही होते.
२५ फेब्रुवारी रोजी रोशन व फिदा हुसेन या दोघांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. त्या वेळी रोशनचे काका यांनी मध्यस्‍ती करून भांडण मिटविले. रोशन भारतीचे वडील आजारी ४ मार्च रोजी रोशनने कंपनीतून ९ हजार रुपये घेतले. त्यानंतर तो फिदा हुसेन याच्यासोबत नवीन कपडे आणण्यासाठी गेला होता. रात्री १०. ३० वाजता त्‍यांच्यात पुन्हा पैशावरून वाद झाला. भांडणात फिदा हुसेन याने रोशनच्या डोक्यात दगड घालून तसेच गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गवत टाकून तो जाळून पळ काढला.
फिदा हुसेनकडे रोशन झोपला असेल असा समज त्‍याच्या काकांच्या झाला. मात्र दुसऱ्या दिवशीही रोशन घरी न आल्‍याने हुसेनकडे विचारणा केली असता, त्‍याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय आल्याने राजकुमार भारती यांनी शोधा-शोध केली असता डोंगरालगतच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्‍या झाडाझुडपांत रोशनचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळला.

हुसेनकडून हत्‍येची कबुली
रबाळे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रोशनचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर फिदा हुसेनला ताब्यात घेत चौकशी केली असता रोशनची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर हुसेनला अटक करण्यात आल्‍याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT