Maharashtra Assembly sakal media
मुंबई

सौरऊर्जा पाणीपंप घोटाळ्यातून शेतकऱ्यांची फसवणूक; विधानसभेत तारांकित प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सौरऊर्जा पाणीपंप घोटाळ्यातून (Solar pump scam) शेतकऱ्यांना फसवण्यात आले आहे, त्यामुळे ही फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार का, असा मुद्दा भाजपचे (bjp) मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat lodha) यांनी सोमवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. लोढा यांनी सौरऊर्जा पाणी पंप घोटाळ्यासंदर्भातील विषय लावून धरला. त्या वेळी लोढा म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार (Maharashtra government) शेतकऱ्यांना नीट वीजपुरवठा करीत नाही. त्यातील पाणी पंपांचे कनेक्शनही सरकारकडून काढले जात आहे.

वीजनिर्मितीचे प्रमाण कमी असल्याचे कारण पुढे करत शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे पंप देण्यात आले. पण गेली दोन वर्षे ते पंप चालत नाहीत. याबाबत तक्रार करूनही काही निष्पन्न होत नाही, असेही त्यांनी दाखवून दिले. याआधी वनवासी भागातील एका महिलेकडून यासंदर्भात तक्रार करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.

या प्रश्नावर उपाय करा किंवा मला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, असेही त्या पत्रात लिहिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांकडून त्याला काहीच उत्तर आले नाही किंवा याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, अशी खंत लोढा यांनी विधानसभेत व्यक्त केली. याविषयी समिती नेमून यासंदर्भातील अहवाल विधानसभेत सादर करण्यात यावा, अशी मागणी लोढा यांनी विधानसभेत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT