Women's bike rally sakal media
मुंबई

ठाण्यात महिला दिन उत्साहात; बाईकस्वार महिलांचा उत्साहपूर्ण सहभाग

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : जागतिक महिला दिनाचे (International women's day) औचित्य साधत मंगळवारी ठाणे शहरातील (Thane City) सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शासकीय अशा सर्व संस्थांच्या माध्यमांतून महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमधून स्त्रियांचा सन्मान (women's respect) आणि गौरव करण्यात आला असून या कार्यक्रमांमध्येही महिलांनी उत्साहात सहभाग घेतला.

शेम बॉडी शेमिंग अभियान

महिलांना समाजात अनेकदा त्यांची शरीरयष्ठी, रंग, राहणीमान यांवरून टोमणे मारले जातात. यातून महिलांना अनेकदा नैराश्याचा सामना करावा लागतो. तेव्हा या गोष्टी कुठे तरी थांबाव्यात या उद्देशाने ठाण्यातील विवियाना मॉलच्या वतीने ‘शेम बॉडी शेमिंग’ या उपक्रमांतर्गत फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. यात वेगवेगळ्या शारीरिक ठेवणी असलेल्या मुलींनी सहभागी होऊन बॉडी शेमिंगविषयी सामाजिक संदेश दिला.

women's day

अबोली रिक्षा चालक महिलांची रॅली

महिला दिनाचे निमित्त साधून नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या पुढाकाराने अबोली रिक्षा चालक महिलांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत २५ महिला रिक्षाचालकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.

महिलांना मोफत रिक्षा सेवा

ठाण्यात मनसेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून प्रवासी महिलांकरिता मोफत रिक्षा सेवा देण्यात आली. पाचपाखाडी ते ठाणे रेल्वे स्थानक आणि नितीन कंपनी जंक्शनपासून ते जांभळीनाका अशी मोफत रिक्षा सेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग अध्यक्ष दिनेश मांडवकर यांच्या पुढाकाराने देण्यात आली. याचा प्रवासी तसेच नोकरदार महिलांना लाभ झाला.

विशेष मूल असणाऱ्या कुटुंबाला आर्थिक मदत

ठाण्यातील स्वामी फाऊंडेशनचे महेश कदम यांच्यातर्फे महिला दिनानिमित्त विशेष मुल असलेल्या कुटुंबाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. तसेच महिलांचे आरोग्य उत्तम राहावे याकरिता मोफत रक्ततपासणी आणि स्त्री रोगतज्ज्ञांचा मोफत सल्ला अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून याचा ठाणे शहरातील अनेक महिलांनी लाभ घेतला.

सावित्रीबाई फुलेंना मानवंदना

ठाण्यातील कोरम मॉल येथे महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी रांगोळी कलाकार निखिल गुरव यांनी सावित्रीबाई फुले यांचे भव्य रांगोळी चित्र साकारले.

मायलेकींचा सन्मान

अभिनय कट्ट्यावर महिला दिनी ‘सन्मान माय-लेकीचा’ हा महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात प्रत्येक मुलीला आपल्या आईप्रती आणि आईला मुलीप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. नौपाडा तसेच ठाणे शहरातील अनेक महिलांनी यात सहभागी होऊन संवाद साधला.

राज्यस्तरीय काव्यसंमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असणाऱ्या मराठी मंडळातर्फे महिला दिनानिमित्त राजस्तरीय काव्यसंमेलन आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. या काव्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपद ठाणे महापौर नरेश म्हस्के यांनी भूषवले असून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उपस्थित होते. या वेळी अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांना कलाभूषण, प्राचार्य रेखा दीक्षित यांना विद्याभूषण, अर्चना पानारी यांना साहित्यभूषण, तृप्ती महाडिक वैद्यक भूषण, अनघा जाधव याना निवेदिका भूषण आणि डॉ. प्रियांका सारंग यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महिलांची बाईक रॅली

शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका तथा वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले-जाधव यांच्या माध्यमातून जागतिक महिलादिनी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात ठाणे शहरातील असंख्य बाईकस्वार महिलांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. या वेळी शिक्षिकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT