मुंबई

महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत सातपाटी संघ विजयी

CD

पालघर, ता. ८ (बातमीदार) ः जागतिक महिला दिनानिमित्ताने उमरोळी येथे महिलांची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत महिला क्रिकेट स्पर्धेत चुरशीच्या लढतीत अंतिम सामना बरोबरीने सुटल्याने नाणेफेक सातपाटी संघ विजेता ठरला; तर जिजाऊ फायटर संघ उपविजेता उमरोळी ठरला.
स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामन्यात आम्ही सातपाटीकर संघाला चषक व ११ हजार १११, जिजाऊ फायटर उमरोळी संघाला चषक व ७ हजार ७७७, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक दोन हजार ५५५ व चषक जिजाऊ टेंभोडे व फायर पास्थळ संघांना प्रदान करण्यात आले. या वेळी वूमन ऑफ द सीरिजचे पारितोषिक सातपाटी संघातील दुषाली धनू हिने पटकावत मानाची पैठणी साडीसुद्धा पटकावली. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज म्हणून ही चषकावर नाव कोरले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रज्ञा पाटील, वुमन ऑफ द मॅच स्वाती घरत यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या वेळी बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य धनश्री पाटील, जिल्हा परिषद सदस्य भावना विचारे, धनश्री रेवदंडेकर, पी. टी. पाटील, प्रभाकर पाटील, रश्‍मी पाटील, मधुकर पाटील, अनिल सिंग, सुरेखा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT