मुंबई, ता. २८ : मुंबईत प्राण्यांवरील उपचारांसाठी नुकतीच अत्याधुनिक अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. या अॅम्ब्युलन्सला ‘फिरती डिस्पेन्सरी’ म्हटले आहे. समस्त महाजन या संस्थेने ही रुग्णवाहिका सुरू केली असून, याद्वारे मुंबईतील आजारी व जखमी प्राण्यांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
२४ मार्चला राज्याचे पशुपालन, दुग्धविकास आणि क्रीडा व युवा व्यवहार मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते या अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन झाले. ही अॅम्ब्युलन्स बोरिवली येथे असून, मुंबईच्या कानाकोपऱ्यात तिची सेवा मिळणार आहे. या अॅम्ब्युलन्समध्ये प्राण्यांवरील उपचारांसाठी आवश्यक सर्व औषधे, बायपॅप, व्हेंटिलेटर, हायड्रोजन ऑक्सिजन जनरेटर, वजन करण्याची यंत्रणा, जनरेटर आदी सुविधा आहेत. माणसांना आवश्यक ते उपचार तात्काळ मिळतात, प्राण्यांना ही सुविधा मिळत नाही. रुग्णवाहिकेकडून ही पोकळी भरून काढणे अपेक्षित असल्याचे समस्त महाजनचे व्यवस्थापकीय विश्वस्त गिरीश शहा यांनी सांगितले.
अॅम्ब्युलन्स घटनास्थळी जाऊन आजारी किंवा दुखापतग्रस्त प्राण्यावर उपचार करते. संपूर्ण उपचार प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद केली जाते आणि लाईव्ह बघताही येते, असे संस्थेचे विश्वस्त व प्रकल्प समन्वयक परेश शहा यांनी सांगितले. ९१५२९९५३९९ हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून आवश्यकता असेल तेथे ही अॅम्ब्युलन्स पोहोचणार आहे. या अॅम्ब्युलन्ससाठी आवश्यक वाहन राष्ट्रसंत श्री नम्रमुनी महाराज आणि अर्हम युवा सेवा ग्रुप यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.