gold robbery
gold robbery sakal media
मुंबई

पनवेल : तोतया पोलिसांनी डॉक्टरचे दागिने लुबाडले; दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : पोलिस असल्याची बतावणी करून दोन तोतयांनी (fake Police) सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची फसवणूक (fraud case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्याजवळ असलेले ४८ हजार रुपयांचे दागिने लुबाडून (gold robbery) नेल्याची घटना पनवेलच्या तक्का परिसरात रविवारी सायंकाळी घडली. पनवेल शहर पोलिसांनी (Panvel city police) या घटनेतील दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. वामन गायकवाड (वय ६२) असे वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव असून ते पनवेलच्या तक्का भागात कुटुंबासह राहण्यास आहेत. रविवारी सायंकाळी डॉ. गायकवाड पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते पायी चालत पनवेल रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना, दोघा तोतया पोलिसांनी त्यांना रस्त्यात अडविले. त्यानंतर पुढे नाकाबंदी सुरू असल्याचे सांगून, त्यांना अंगावरील दागिने काढून देण्यास सांगितले.

या प्रकारामुळे घाबरलेल्या डॉ. गायकवाड यांनी आपल्या अंगावरील दागिने काढून तोतया पोलिसांना दिले. तोतयाने दागिने एका कागदामध्ये बांधून देण्याचा बहाणा करून ४८ हजार रुपयांचे दागिने हातचलाखीने काढून घेतले आणि रिकामा कागद गायकवाड यांच्याजवळील पिशवीमध्ये टाकला. त्यानंतर पिशवीला गाठ मारून ती डॉ. गायकवाड यांना देऊन तिथून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. गायकवाड यांनी याची पोलिसात तक्रार केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT