मुंबई

कांदा बटाट्याच्या दरात घसरण

CD

वाशी, ता. ३० (बातमीदार) ः घाऊक कांदा-बटाटा बाजारात सध्या खरेदीदारांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे कांदा-बटाट्याच्‍या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सध्या बाजारात दररोज १०० ते १५० गाड्यांची आवक होत आहे. मात्र त्या मानाने कांद्याला उठाव नसल्याने दर घसरले आहेत. कांद्याचे दर २० ते २२ रुपयांवरून १० ते १३ रुपये किलोपर्यंत आले आहेत.
राज्यात सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढला आहे. पुढील तीन-चार दिवस उन्हाच्या झळा बसणार असल्‍याचा इशारा हवामान खात्‍याने दिला आहे. पारा वाढल्‍याने भाज्‍यांची आवक कमी झाल्‍याने दर वाढले आहेत; तर कांदा-बटाटा मार्केटमध्ये आवक वाढल्‍याने दर कमी झाले आहेत.
बाजारात ग्राहक नसल्याने बराच माल पडून आहे. त्यामुळे कांदा-बटाट्याचे दर घसरले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला घाऊक बाजारात कांद्याचे दर २० त २२ रुपये किलोपर्यंत होते; तर किरकोळमध्ये ३० रुपयांपर्यंत दर पोचले होते. आता घाऊक बाजारात कांदा १० ते १३ रुपये किलो झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कांदा २० रुपये किलोच्या घरात असल्‍याची माहिती घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे.
बटाट्याचे दरही १२ ते १४ रुपये किलो झाले आहेत. आतापर्यंत बाजारात नवीन बटाटा येत होता. मात्र वाढत्या उष्णतेमुळे बटाट्याचे मोठे नुकसान होत होते. गाडीतच बटाटा खराब होत आहे. त्यामुळे बटाट्याच्या दरात घसरण झाल्‍याचे पाहायला मिळते. गेल्‍या दोन-चार दिवसांपासून शीतगृहातील बटाटा बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे चांगला माल बाजारात येत आहे. मात्र असे असले तरी बाजारात खरेदीदार नसल्याने मालाला उठाव मिळत नसल्याने दरात घसरण सुरूच आहे.

कांद्याचे घाऊक दर
महिन्याभरापूर्वी २० ते २२
आता १० ते १३

किरकोळ दर
कांदा २० ते २२
बटाटा २२ ते २५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Investment Rule: पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय! गुंतवणूक नियमांमध्ये मोठे बदल, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, कसा फायदा होणार?

IPL 2026 Auction पूर्वी भारतीय गोलंदाजाची शैली वादात; फ्रँचायझीने पैसा लावण्यापूर्वी करावा विचार, त्याच्यावर बंदीची टांगती तलवार...

Navi Mumbai Airport: फ्लाइट सुरू होण्यापूर्वीच नवी मुंबई विमानतळावर घुसखोरी; एकाला अटक, नेमकं काय घडलं?

Satara Drug Bust : साताऱ्यात खळबळ! सावरीतील शेडवजा फॅक्टरीत १५ कोटींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त, मुंबई पोलिसांची गुप्त कारवाई

Solapur Railway News: पूल पाडकामासाठी सोलापुरात रविवारी मेगा ब्लॉक; ९ रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले

SCROLL FOR NEXT