मुंबई

एसी, कूलर सर्व्हिसिंगला सुगीचे दिवस

CD

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ३० : उन्हाचा पारा हा ४० अंशांच्या पार गेल्याने घरोघरी एसी, कूलर लावण्याची, तसेच त्यांची सर्व्हिसिंग करून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मार्च महिन्यात अचानक तापमानात वाढ झाल्याने या दिवसांतच एसी सर्व्हिसिंगला सुगीचे दिवस आले आहेत. गेली दोन वर्षे कोरोनामुळे एसी सर्व्हिसिंगचा व्यवसाय बंद होता; परंतु कोरोनाची लाट ओसरल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हाताला पुन्हा काम मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
घरात एसी लावल्यानंतर त्या कंपनीकडून वर्षभरात तीन सर्व्हिस मोफत दिल्या जातात. त्यानंतर मात्र ठराविक रक्कम आकारली जाते. त्यामुळे ग्राहक हार्डवेअर दुकानांची धाव घेतात. येथील स्वस्तातील कारागीर शोधून एसी वा कुलरची दुरुस्ती होते. अगदी ४०० रुपयांपासून ते जास्तीत जास्त ८०० रुपयांपर्यंत दर त्यासाठी आकारले जातात. दरम्यान, डोंबिवलीतील महादेव हार्डवेअरचे कर्मचारी सांगतात, एसी सर्व्हिसिंगला या महिन्यापासून मागणी वाढली आहे. त्यासाठी ६५० रुपये दर आम्ही आकारतो, जे मागच्यावर्षीप्रमाणेच आहेत.

कोरोनामुळे दोन वर्षे व्यवसाय ठप्प होता. एक दोन ग्राहक अगदीच पर्याय नसल्याने काम द्यायचे. या वर्षी परिस्थिती वेगळी आहे. मार्च महिन्यापासून आमच्याकडे दिवसाला १५-२० जणांची कामे सहज येत आहेत. त्यानुसार कारागिर बोलावून आम्ही काम करून घेतो. ग्राहकांची आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे फारशी चांगली नसल्याने सर्व्हिसिंग दरामध्ये आम्ही कोणतीही वाढ केलेली नाही.
- राजेश नायर, डोंबिवली.

कोरोनानंतर आता कुठे आमच्या हाताला काम मिळू लागले आहे. अजूनही अनेक जण एसी-कुलर दुरुस्तीसाठी घरी बोलावण्यास टाळाटाळ करतात. तरीही ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय. आपल्याकडील ग्राहक जाऊ नये म्हणून सर्विसिंगचे दर कमी केले आहेत. या वर्षी आर्थिक फटका बसला तरी हरकत नाही, ग्राहक जोडलेला राहील.
- दीपक गावडे, डोंबिवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Circular : राज्य सरकारचा मोठा निर्णय! दहीहंडीची सुट्टी रक्षाबंधनाला जाहीर, शुद्धीपत्रक जारी

Almatti Dam Water Level : आलमट्टी धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! 24 तासांत 89 हजार क्युसेकने पाण्याची आवक; पाणीसाठा 119 टीएमसीवर...

Mumbai Rain: चीनच्या 'डॉल्फिन'ने रोखलेला मान्सून पुन्हा सक्रिय! मुंबई पुण्यासह महाराष्ट्राला सुखावणारी बातमी, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Marathi News Live Updates : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

Madhuri Elephant Return : 'वनतारा'त गेलेली माधुरी हत्तीण परत येणार? उच्चस्तरीय समिती 20 दिवसांत सादर करणार अहवाल, संयुक्त पथकाकडून तपासणी

SCROLL FOR NEXT