मुंबई

वीज ग्राहकांना ३१ मार्चपूर्वी बिल भरण्याची सक्‍ती!

CD

खारघर, ता. ३० (बातमीदार) : घरगुती वीजबिल ३१ मार्चपूर्वी भरावे अन्यथा वीजजोडणी कापली जाईल, असे महावितरणकडून दूरध्वनीवरून तसेच घरोघरी येऊन सांगितले जात असल्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे ३१ मार्चपर्यंत लेखाजोखाची कामे जोरात सुरू आहे. त्यात खारघर मधील ८ ते १९ परिसरात महावितरणचे कर्मचारी दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष घरी येऊन थकीत आणि चालू वीज बिल भरावे अन्यथा वीज जोडणी कापले जाईल, अशा सूचना ग्राहकांना करीत आहेत.
मार्च महिन्याचे वीज बिल २६ मार्चला ग्राहकांना प्राप्त झाले असून त्यावर १६ एप्रिल ही शेवटची तारीख आहे. असे असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन ३१ मार्चपर्यंत भरण्याची सक्ती केली जात आहे. त्‍यामुळे शासनाने महावितरणसाठी नवीन कायदा केला आहेत का, असा प्रश्न वीज ग्राहकांकडून विचारला जात आहे.

वीज आवश्यक असल्यामुळे बहुतांश ग्राहक वेळेवर बिल भरतात. सेक्टर १९ मध्ये ग्राहकांना तीन दिवसांपूर्वी वीज बिल मिळाले असून वीजबिल भरणाची १६ एप्रिल ही शेवटची तारीख असताना महावितरणचे कर्मचाऱ्यांकडून ३१ मार्च पूर्वी बिल न भरल्‍यास वीज जोडणी कापली जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये महावितरणच्या कामकाजाविषयी नाराजी पसरली आहे.
- बिना गोगरी, ग्राहक, सामाजिक कार्यकर्त्या

थकीत बिल भरण्याच्या सूचना
बिल बिल भरण्याबाबत ग्राहकांना करण्यात येणाऱ्या सक्‍तीबाबत खारघरमधील महावितरणच्या कार्यालयात विचारणा केली असता, ग्राहकांनी थकीत वीज बिल भरणे आवश्यक आहे. तसेच कोणाचेही वीजमीटर काढले जाणार नसल्‍याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT