property tax  sakal media
मुंबई

भिवंडी : ८५ कोटींचा मालमत्ता कर वसूल; महापालिका प्रशासनाची माहिती

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : थकबाकीदारांकडून वसुलीसाठी भिवंडी पालिकेने (Bhiwandi Municipal corporation) राबविलेल्या विशेष योजनांना यश आले आहे. शिवाय थकबाकीवरील व्याजमाफीच्या अभय योजनेचादेखील (Abhay Yojana) अनेकांनी फायदा घेतला. त्यामुळे तब्बल ८५ कोटी रुपये मालमत्ता कर (Property tax) वसूल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भिवंडी महापालिकेच्या महापौर प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांनी नगरसेवक, पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची विशेष बैठक घेऊन मालमत्ता कर वसुलीसंदर्भात चर्चा करून एक ते पाच प्रभाग कार्यालयस्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके निर्माण केली.

या पथकांनी करवसुलीसाठी विशेष मेहनत घेतली. मागील वर्षी हाच वसुलीचा आकडा ७३ कोटी होता. चालू वर्षी हीच वसुली ८३ कोटी आहे. तसेच मालमत्ता करासंबंधित तीन कोटींचे वेगळे चेक जमा झाले आहेत. त्यामुळे यंदा तब्बल ८५ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. १५ डिसेंबर २०२१ रोजी अभय योजना जाहीर करण्यापूर्वी १९ कोटींची वसुली होती. या तीन महिन्यात जवळपास ६४ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. एकूण मालमत्ता करवसुली ९७ कोटी ९२ लाख झाली. त्यापैकी अभय योजनेत १५ कोटी ५१ लाख रुपयांचा व्याज माफी जाता निव्वळ वसुली हा ८२ कोटी ३३ लाख झाला आहे.

करवसुलीमध्ये यामध्ये एकूण २४३५ नळ खंडित करण्यात आले, तर १६४ मालमत्ता सील करण्यात आल्या; तर ६३ मालमत्ता यांचे जप्ती कारवाई करण्यात आली आहे. मागील तीन महिन्यात एकूण ६२ कोटी ९० लाख रुपये जमा झाले आहेत. यापुढेदेखील वसुलीची कारवाई सुरू राहणार आहे, अशी माहिती उपायुक्त दीपक झिंजाड यांनी दिली.

प्रभाग समिती क्रमांक वसुली
१ २३ कोटी ४० लाख
२ १६ कोटी ७३ लाख
३ १७ कोटी ५० लाख
४ १५ कोटी १६ लाख
५ ९ कोटी ७२ लाख
एकूण ८२ कोटी ५१ लाख वसूल झाले आहेत.


८५ कोटी ३७ लाख रक्कम जमा झाली आहे. यामध्ये दोन हजार करदात्या नागरिकांनी ऑनलाईन सेवेचा फायदा घेतला. यातून तीन कोटी रक्कम पालिकेला मिळाली. वसुली मोहीम चालू राहणार असून आता व्याजमाफी मिळणार नाही.
- दीपक झिंजाड, उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Air India Plane Crash : स्विच बंद झालं अन्.....अहमदाबाद विमान अपघाताला एअर इंडियाच जबाबदार? प्राथमिक तपास अहवालात धक्कादायक माहिती उघड

Crop Loss: पाणीच पाणी... सोयाबीन, तुरी, कपाशी पाण्याखाली; शेतकऱ्यांची पुन्हा पेरणीची वेळ, विदर्भात पावसाने हाहाकार

Blood Sugar Monsoon: पावसाळ्यात रक्तातील साखर का वाढते? डॉक्टर सांगतात कारणे आणि उपाय

Nagpur Traffic AI : वाहतूक नियम मोडाल तर थेट ‘एआय’कडून चालान! स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम सक्रिय; २०२६ पर्यंत सर्वत्र लागू

Haldiram: नागपूरच्या हल्दीराम समूहाला कोट्यवधी रुपयांना गंडा; मुंबईतल्या चौघांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT