crime case sakal media
मुंबई

चोर पती-पत्नीला नालासोपाऱ्यात चोप; दोघांना ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : बाजारात, गर्दीच्या ठिकाणी अतिशय सभ्यपणाचा बुरखा घालून महिला-पुरुषांचे पाकीट चोरणाऱ्या पती-पत्नीचा नालासोपाऱ्यात भांडाफोड झाला. बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारताच (pocket robbery) संतप्त जमावाने चोर महिलेला (Thief husband wife arrested) पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. नालासोपारा (Nalasopara) पूर्व ओसवाल नगरी येथे रविवारी (ता. ३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी तुळिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Police FIR Filed) करून, चोर पती-पत्नीला अटक केली आहे.

गौरी रावल (३२) आणि मंगेश रावल अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही जोगेश्वरी पूर्वेतील दत्ता टेकडी सोमावटे चाळ येथील राहणारे आहेत. नालासोपारा पूर्वेतील ओसवाल नगरी परिसरात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्या महिलेने दोन महिलांचे पाकीट मारले होते.

पहिले पाकीट मारताना कुणालाही कळले नव्हते; पण जेव्हा दुसरे पाकीट मारले तेव्हा संबंधित महिलेच्या लक्षात आल्यावर तिने लगेच आरडाओरडा केला. नागरिकांनी चोर महिलेला तात्काळ पकडले आणि बेदम चोप दिला. पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी धाव घेत महिलेला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

...अशी करायचे चोरी

चोरटे पती-पत्नी गर्दी किंवा बाजाराच्या ठिकाणी जातात. पत्नी बॅग, खिशामधील पॉकीट मारते आणि लगेच बाजूलाच उभ्या असलेल्या पतीच्या ताब्यात देते. पती ते घेऊन सामान्य नागरिकाप्रमाणे बघ्याची भूमिका घेतो आणि कुणाला कळायच्या आत दोघेही निघून जातात; पण रविवारी पॉकीट मारताना पकडल्याने यांचा भांडाफोड झाला. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी प्रत्येकाने सावध राहावे, असे अवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT