Kopar bridge sakal media
मुंबई

Sakal Impact : कोपर पूलाच्या जिन्यांचे काम पूर्ण; नागरिकांची पायपीट वाचली

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर पूल (Dombivali-kopar bridge) हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असला, तरी पादचाऱ्यांसाठीही तो तितकाच महत्त्वाचा मानला जातो. मागील वर्षी गणपतीत हा पूल वाहतुकीसाठी (open for vehicles) खुला करण्यात आला; मात्र पुलाचे इतर काम शिल्लक राहिल्याने पादचाऱ्यांना (Pedestrian) त्याचा त्रास सहन करावा लागत होता. राजाजी पथ रोडवर उतरणाऱ्या जिन्यांचे काम पूर्ण झाले नसल्याने पादचाऱ्यांना मोठा वळसा घालून पुलावर जावे लागत होते.

याविषयी ‘सकाळ’ने वृत्तदेखील प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पायऱ्यांचे काम पालिका प्रशासनाने पूर्ण केले असून नागरिकांची मोठी पायपीट वाचली आहे. उन्हाळ्यात या जिन्यांचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण आहे. वाहनांसाठी कोपर पूल जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच पादचाऱ्यांसाठीही महत्त्वाचा आहे. डोंबिवली पश्चिमेला असलेले पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय, शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पूल म्हणजे जवळचा मार्ग आहे. अन्यथा नागरिकांना डोंबिवली रेल्वे स्टेशन गाठून पायपीट करावी लागते.

कोपर पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यावर पूर्वेतील राजाजी पथ रोडवर पुलावर जाण्यासाठी जिने नसल्याने प्रवाशांना मोठा वळसा घालून पूलावर जावे लागत होते. दत्तनगर, नांदिवली, आयरेगाव, राजाजी पथ आदी परिसरात राहणारे नागरिक पश्चिमेला जाताना कोपर पुलावर जाण्यासाठी राजाजी पथ रोडवरील जिन्याचा वापर करतात. हे जिनेच नसल्याने त्यांना टंडन रोडवरून किंवा केळकर रस्ता मार्गे गोल फिरून राजाजी पथ रोडवर यावे लागत होते. हा मोठा वळसा पडत असल्याने जिन्यांचे काम लवकर व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत होती.
अखेर पालिका प्रशासनाला जाग येत मार्च महिन्यात पालिका प्रशासनाने पुलावरील मास्टिक अस्फाल्टचे तसेच जिने उभारणीचे काम हाती घेतले होते.

नागरिकांकडून स्वागत

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने वळसा घालून पायपीट करण्यापेक्षा आता नागरिकांना राजाजी पथ रोडवरून थेट पुलावर चढून पूर्व पश्चिमेला ये- जा करता येत आहे. जिन्यांचे काम पूर्ण होताच पादचाऱ्यांनी या जिन्यांचा वापरदेखील करण्यास सुरुवात केली आहे. जिन्याचे काम केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT