Accident Sakal Media
मुंबई

टेम्पोच्या धडकेत वाहतूक पोलिस जखमी; टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर नेरूळ-उरणफाटा येथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस (Traffic Police injured) शकील रमजान जमादार (४९) यांना भरधाव टेम्पोने धडक (Tempo Accident) देऊन पलायन केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. अपघातात जमादार यांचा मणका फ्रॅक्चर होऊन त्यांच्या हाता-पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना सीबीडीतील एमजीएम रुग्‍णालयात (MGM hospital) दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सीबीडी पोलिसांनी (cbd police) पळून गेलेल्या आयशर टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अपघातात जखमी झालेले पोलिस शकील जमादार हे सीबीडी वाहतूक शाखेत कार्यरत असून रविवारी त्यांना मुंबई-पुणे लेनवर नेरूळ-उरण फाटा येथील चौकात कर्तव्यावर नेमण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास व्हीआयपी व्यक्तीचे वाहन उरण फाटा येथून सीबीडीच्या दिशेने गेल्यानंतर काही वेळातच जमादार यांना मागून भरधाव आलेल्या टेम्पोने धडक दिली. त्‍यानंतर टेम्पो सीबीडीच्या दिशेने निघून गेला.

जखमी जमादार यांना समोरील पॉँईटवर कर्तव्यावर असलेले पोलिस शिपाई सागर गायकवाड यांनी तत्काळ सीबीडीतील एमजीएम रुग्‍णालयात दाखल केले. जमादार यांच्या मणक्यामध्ये फ्रॅक्चर झाल्याचे, तसेच त्याच्या उजव्या हाताला तसेच दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली आहे. सीबीडी पोलिस टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT