Murder crime sakal media
मुंबई

रायगड : अनैतिक संबंधातून चुलत आत्याची हत्या; तीन तासांत आरोपी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

रोहा : चुलत आत्याबरोबर असलेले अनैतिक संबंध (extra marital relationship) आणि तिच्याकडून पैशांची वारंवार होणारी मागणी (Money demand) यामुळे त्रस्त झालेल्या भाच्याने स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी आत्याचा दगडाने ठेचून खून (woman murder case) केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना रोहे तालुक्यातील नागोठण्याजवळील रिलायन्स निवासी संकुलासमोरील जंगलात रविवारी (ता. ३) दुपारी घडली. या घटनेतील आरोपीला (culprit arrested) नागोठणे पोलिसांनी (Nagothane Police) तीन तासांत जेरबंद केले.

नागोठणेजवळील उनाठवाडीतील २२ वर्षीय तरुण या घटनेतील आरोपी आहे. याच गावात राहणाऱ्या ३२ वर्षीय मृत महिलेचा पहिल्या लग्नानंतर घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिने दुसरे लग्नही केले होते. आरोपी हा या महिलेच्या चुलतभावाचा मुलगा आहे. या दोघांचे दोनतीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. या संबंधांमुळे वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे दोघांमध्ये वाद होता. या महिलेने आरोपीवर शस्त्राने वार केल्याचा राग आरोपीच्या मनात होता. याच पार्श्वभूमीवर तिला संपवण्याचा कट आरोपीने रचला.

रविवार दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रिलायन्स निवासी संकुलाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या करकरणी देवीच्या मंदिराकडील डोंगराकडे जाण्यासाठी एक जोडपे मोटरसायकलवरून आल्याचे जयेश घासे व चेतन गदमले (रा. शिहू) या सुरक्षारक्षकांनी पाहिले होते. त्यानंतर त्यांनी मोटरसायकल उभी केल्यानंतर दोघेही जंगलाकडे जाताना त्यांच्यात वाद सुरू असल्याने जयेशला संशय आला. त्याने मोबाईलमध्ये मोटरसायकलची छायाचित्रे काढली. नंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आरोपी एकटाच खाली आला.

त्याने मोटरसायकलमधील पेट्रोल बाटलीत भरून तो पुन्हा जंगलात गेला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा खाली आला. याचदरम्यान जंगलातून धूर येत असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरोपीस थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या वेळी तो पळून जाण्यात यशस्वी झाला; मात्र नंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी मोटरसायकलचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केले. त्यानुसारच उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिस पथकाने आरोपीस त्याच्या घरातून ताब्यात घेतले.

सतर्कतेमुळे आरोपी ताब्यात

रिलायन्स निवासी संकुलाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या करकरणी देवीच्या मंदिराकडील डोंगराकडे खून झाल्याची घटना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना समजली; तर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास संपूर्ण गुन्ह्याची उकल झाली. घटनास्थळ हा जंगल परिसर असल्याने तपासात अडथळे येऊ शकत होते; मात्र सुरक्षा रक्षक जयेश घासे, चेतन गदमले आणि पोलिस नाईक गंगाराम डूमना यांच्या सतर्कतेमुळे आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT