PM Narendra Modi sakal media
मुंबई

‘दिवाळे स्मार्ट व्हिलेज’ला PM मोदींच्या शुभेच्छा; गावाचा होणार कायापालट

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात (Navi Mumbai City) पहिल्यांदाच साकारण्यात येणाऱ्या ‘दिवाळे स्मार्ट व्हिलेज’ला (Diwale smart village) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनी सोमवारी मोदींची दिल्ली येथे भेट घेतली. या प्रसंगी प्रकल्पात उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांच्या (Basic facilities) विविध वास्तू, सुटसुटीत रस्ते, सुनियोजित पदपथ, मार्केट, बहुउद्देशीय इमारती आदींबाबत म्‍हात्रे यांनी माहिती दिली.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी, २९ मार्चला दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेजचे भूमिपूजन झाले. नवी मुंबईतील हा पहिलाच प्रकल्प असल्याने या प्रकल्पाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहरासारखी जागतिक कीर्तीचे नियोजित शहर उभे राहीले. परंतु या शहरातील गावाची नियोजनाअभावी दुर्दशाच झाली. दाटीवाटीने बांधकाम आणि अनधिकृत बांधकामांमुळे आलेली अवकळा आता स्मार्ट व्हिलेजमुळे दूर होणार आहे. या प्रकल्पामुळे दिवाळे गावाचा कायापालट होणार आहे.

मंदा म्हात्रे यांच्या अविरत पाठपुराव्यामुळे याआधीच गावातील मच्छीमार बांधवांना मासळी सुकविण्यासाठी व होड्यांसाठी अद्ययावत जेटी उभारण्यात आली आहे. त्यानंतर मोकळे रस्ते उभारण्याचे काम सुरू आहे. आता त्यापाठोपाठ गावाला लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांचा नियोजित विकास केला जाणार आहे. मासळी मार्केटपासून ते बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून अर्थसाहाय्य उभे केले जाणार आहे.

प्रकल्‍पाच्या दर्जेदार कामावर लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारणारे दत्तक गाव योजनेतून मंदा म्हात्रे यांनी दिवाळे गाव दत्तक घेत पहिले स्मार्ट व्हिलेज साकारणार आहे. तत्पूर्वी या प्रकल्पाची मंदा म्हात्रे यांनी दिल्ली येथे पंतप्रधानांची भेट घेऊन सर्व माहिती सादर केली. हा प्रकल्प कसा आणि कधीपर्यंत पूर्ण होणार याची चौकशी मोदी यांनी म्हात्रेंकडे केली. तसेच या प्रकल्पाच्या दर्जेदार कामासोबतच पूर्णत्वाला येणाऱ्या कामांवर विशेष लक्ष ठेवणार असल्याची ग्वाही म्हात्रेंकडे दिली. त्यामुळे दिवाळे गावाचे नाव स्मार्ट व्हिलेज होण्याआधीच दिल्लीपर्यंत पोहोचले असल्याने मंदा म्हात्रे यांनी आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

Marathi News Live Updates : ‘पुढील वर्षी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील’; चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा

कच्चं तेल १०८ डॉलरवर, सोमवारी ३.३ टक्क्यांची वाढ; कोणत्याही क्षणी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

Ganeshotsav : वैद्यकीय साहित्यापासून साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; आरोग्यसेवा व पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT