Swimmers at gate way of india google
मुंबई

'आझादी का अमृत महोत्सव'; भारतातील सर्वात मोठे सागरी जलतरण अभियान

सकाळ वृत्तसेवा

वडाळा : ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत भारतातील सर्वांत मोठे आणि पहिले सागरी साहसी जलतरण अभियान (Sagari Jaltaran Abhiyan) राबवण्यात येत आहे. बुधवारी (ता. ६) मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते घारापुरी लेणी (Elephanta caves) व तेथून परत अशा साधारण ३१ किलोमीटर अंतराच्या या अभियानाकरिता राज्यातील उत्कृष्ट ५० जलतरणपटू (swimmer) निवडले होते. यात १० ते ६० वर्षांपर्यंतच्या जलतरणपटूंचा समावेश होता.

क्रीडाक्षेत्रात जनजागृतीची गरज असल्याचे लक्षात घेऊनच सागरी साहसी जलतरण अभियान राबविण्याचा मानस महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष जय कोळी यांनी महाराष्ट्र शासनाचे क्रीडा विभाग मुख्य संयोजक जयप्रकाश दुबळे यांना सांगितला. त्याप्रमाणे नागपूर जिल्हा हौशी जलतरण संघटना, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्वीमिंग, सागरी साहसी जलतरण प्रशिक्षण केंद्र, जुहू बीच, जेडी स्पोर्ट्स फाऊंडेशन, इंडियन ड्रायव्हर अँड एक्सप्लोरर्स असोसिएशन यांच्याशी संपर्क साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अस्वच्छतेपासून, जल प्रदूषणापासून, जलतरण क्षेत्रातील स्पर्धकांना बुडण्यापासून आझादीचा संदेश देण्यासाठी हे अभियान राबवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT