ATM robbery  sakal media
मुंबई

नवी मुंबई : एटीएम सेंटरमध्ये हातचलाखी करणारी टोळी गजाआड

सकाळ वृत्तसेवा

नवीन पनवेल : एटीएममधून पैसे काढणाऱ्या (ATM Money Robbery) व्यक्तींचे लक्ष विचलीत करून एटीएमची अदलाबदल करून पैसे लंपास करणाऱ्या (Bihar gang busted) बिहारमधील टोळीला पनवेल गुन्हे शाखा (Panvel crime branch) कक्ष दोनच्या पथकाने नुकतीच अटक केली. ही टोळी घातक शस्त्रांसह एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. त्यांच्याकडून घातक शस्त्रांसह बँकांचे ८९ एटीएम कार्ड हस्तगत (ATM card seized) करण्यात आले आहेत.

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तींचे लक्ष विचलीत करून फसवणुकीच्या घटना घडतात. याबाबत नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील अनेक ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आयुक्त बिपीनकुमार सिंह, सहपोलिस आयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलिस आयुक्त महेश घुर्ये, उप आयुक्त सुरेश मेंगडे यांनी आदेश दिले होते.

त्याप्रमाणे सहायक आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने कर्नाळा स्पोर्टस क्लब परिसरात एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या दरोड्याची तयारी करत असताना बच्चा महावीर महातो, मुनीलाल कुमार कृष्णा महातो, नवीन इंदर सवान आदींना अटक केली. त्यांच्याकडून ८९ एटीएम कार्ड जप्त करण्यात आले. या प्रकरणी फसवणुकीचे १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अशी झाली अटक

वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फसवणूक झालेल्या व्यक्तींकडून या प्रकरणी माहिती घेऊन संबंधित एटीएम सेंटरमधील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाचा अभ्यास केला. त्यावेळी बिहारमधील एक टोळी सक्रिय असल्याबाबत खात्री झाली. ही टोळी काही कालावधीसाठी मुंबईत येऊन गुन्हे करून परत बिहार येथे निघून जाते, असे आढळून आले. त्यांच्यावर पाळत ठेवली असता, ही टोळी पनवेल शहर येथील काही एटीएम सेंटरवर दरोडा टाकणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Patil Gokul Controversy : मंत्री चंद्रकांत पाटील आमचे नेते आहेत, ते बोलले ते काय चुकीचे बोलले का? आमदार राजेश क्षीरसागर यांचा सतेज पाटलांवर निशाणा

IND vs NZ 5th ODI: गुरनूर ब्रार, पाचव्या वन डे सामन्यातून बाहेर! टीम इंडियाच्या Playing XI मध्ये त्याच्याजागी कोणाला संधी मिळणार?

Latest Marathi News Live Update: दुय्यम निबंधकाला 50 हजारांची लाच घेताना अटक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे युनिटची कारवाई

Nagpur News: स्मार्ट मीटरमुळे सात महिन्यांत १० कोटींची बचत; महावितरणचा दावा ; दिवसासाठी बिलात सूट

छटपूजेसाठी उल्हास नदीत मातीचा भराव, महसूल विभागाची कारवाई; पालिकेला कारणे दाखवा नोटीस

SCROLL FOR NEXT