मुंबई

सरकारी शाळांमधील सीसीटीव्हीप्रक्रिया लांबणीवर

CD

मुंबई, ता. ७ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत. मात्र, अद्याप ६३ हजारांहून अधिक शाळांमध्ये ते लागलेले नाहीत. शिवाय शिक्षण विभागाने कोणतीही ठोस आर्थिक तरतूद केली नसल्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६५ हजारपैकी केवळ एक हजार ६२४ शाळांमध्येच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. उर्वरित ६३ हजार ३७४ शाळांमध्ये ते लावण्यात आलेले नाहीत. त्यासाठी कोणतीही ठोस आर्थिक तरतूद नसल्याने सरकारला येणाऱ्या सीएसआर निधीचा मोठ्या प्रमाणावर आधार घ्यावा लागणार असून त्यासाठीची सर्व प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे हित लक्षात घेऊन राज्यात असलेल्या राज्य आणि केंद्रीय आदी शिक्षण मंडळाच्या खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे स्पष्ट निर्देश होते. सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. शिक्षणमंत्र्यांच्या निर्देशानंतर राज्यात काही खासगी शाळांकडून अंमलबजावणी सुरू झाली; परंतु सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकारी सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT