कोरोना डोस Sakal
मुंबई

किशोरांच्या कोविड डोससाठी ठोस प्रयत्न

लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांची यादी सादर करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : १२ ते १४ वयोगटातील किशोरांच्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी पालिकेकडून फॅमिली फिजिशियन, शाळा व्यवस्थापन तसेच सामाजिक संस्थांशी संपर्क साधण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यात येत आहेत. कोविन पोर्टलनुसार, आतापर्यंत १२ ते १४ वयोगटातील ४४,४७९ किशोरांचे लसीकरण करण्यात आले आहे, याचा अर्थ मुंबईत केवळ ११.११ टक्के मुलांनाच कोविड डोस देण्यात आले आहेत.

महापालिकेतर्फे शिक्षण विभागाला त्यांच्या प्रभागातील लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांची यादी सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. शाळांजवळ लसीकरण शिबिरे घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, मुलांमध्ये कोविड लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी शिक्षण विभाग आणि गैरसरकारी संस्थांसोबत बैठका घेतल्या आहेत. आम्ही शहरात प्रत्येकापर्यंत लशीविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी शिबिरे आयोजित करणार आहोत. ज्याचा फायदा मुलांना आणि त्यांच्या पालकांना होण्यास मदत होईल. गणपती मंडळे, दहीहंडी उत्सव मंडळे, आमदार आणि नगरसेवकांना त्यांच्या भागातील मुलांसाठी लसीकरण शिबिरे आयोजित करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. गोमारे पुढे म्हणाल्या की, त्यांनी खासगी किंवा फॅमिली डॉक्टरांची भेट घेण्याची योजना आखली आहे, जे मुलांचे समुपदेशन करू शकतील. लसीकरणाबाबत पालक आणि मुलांमधील संभ्रम दूर करण्यासाठी लसीकरण मोहिमेत कौटुंबिक डॉक्टरांचा सहभाग असेल. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दररोज कोविड -१९ रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे मोहिमेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, पालिका शाळांमध्ये लस घेण्यास पात्र असलेले अंदाजे ७० हजार विद्यार्थी आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये जागृती
पात्र विद्यार्थ्यांचा डेटा एकत्र करणे, लसींबद्दल जागरूकता निर्माण करणे, मुलांना जवळच्या लसीकरण केंद्रात नेण्यास सुरुवात करणे, या मुलांच्या लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी शाळांना घेण्यास सांगण्यात आले आहे, असे एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT