jitendra awhad sakal media
मुंबई

हल्लेखोरांच्या रक्तात मद्याचे अंश; आव्हाडांची खळबळजनक माहिती

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील घरावर हल्ला करणाऱ्या अनेकांच्या रक्तामध्ये मद्याचे अंश (Alcohol in blood) सापडले असल्याची खळबळजनक माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली. महात्मा गांधींच्या हत्येच्या (Mahatma Gandhi death) वेळी समाजामध्ये जे विष पेरण्यात आले होते, आताही असेच विष शरद पवार यांच्याविरोधात पेरण्याचे काम सुरू असल्याचा दावाही ठाण्यात आयोजित मूक मोर्चात केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने केली. ठाण्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधून मूक आंदोलन केले.

या आंदोलनात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. आम्ही एसटी कर्मचऱ्यांच्या विरोधात नाही. हल्ल्याचा तीन एसटी कर्मचारी संघटनांनी निषेध केल्याच्या बातम्या वाचायला मिळाल्या; पण शुक्रवारी ज्यांनी हल्ला केला. त्यापैकी अनेकांच्या रक्तामध्ये मद्याचे अंश सापडले असून कालची घटना ही महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी होती, अशी प्रतिक्रिया यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT