Kalyan Railway station sakal media
मुंबई

कल्याण रेल्वे स्थानक बनला मृत्यूचा सापळा; तीन महिन्यात ७८ जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात (Kalyan Railway station) रेल्वे प्रशासनाने मूलभूत सुविधा (Basic facility) दिल्या असताना या स्थानकात वाढते अपघात पाहता रेल्वे स्थानक मृत्यूचा सापळा (Death Location) बनत आहे. लोकल, मेलमधून पडून तसेच रूळ ओलांडताना होणारे अपघात (Railway Accidents) वाढले आहेत. मागील तीन महिन्यात रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातामध्ये ७८ जणांचा मृत्यू झाला असून ६५ जण जखमी झाले आहेत.

कल्याण रेल्वे स्थानक हे देशातील गर्दीचे तिसरे रेल्वे स्थानक असून सात फलाट आहेत. येथून लोकल आणि मेल गाडीने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनाने सरकते जिने, पादचारी पूल बसवले आहेत; मात्र तरीसुद्धा बेशिस्त प्रवाशांमुळे अपघात होत आहेत. रेल्वे क्रॉसिंग करताना होणाऱ्या अपघातामध्ये वाढ झाली आहे.

जानेवारी ते मार्च कालावधीत झालेले अपघात मृत्यू
रेल्वेरूळ ओलांडताना अपघात - ४०
लोकल, मेलमधून पडून अपघात - १६
खांबाला धडकून अपघात - २
नैसर्गिक मृत्यू - १८
इतर कारणाने मृत्यू - २

१७ मृतदेहांची ओळख पटवण्याचे आवाहन

रेल्वे स्थानकात झालेल्या एकूण मृत्यूची संख्या ७८ असून यात पुरुष ७५ असून तीन महिलांचा समावेश आहे. ६१ मृतांचे वारस सापडले असून १७ मृतांचे वारस शोधण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांना समोर आहे.

प्रवाशांनी चालत्या गाडीतून उतरू अथवा चढू नये. रेल्वे प्रवास करताना रेल्वे स्थानकात पादचारी पूल आणि सरकत्या जिन्याचा वापर करावा.
- वाल्मिक शार्दूल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण रेल्वे पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT