मुंबई

मानखुर्दमध्ये तणावपूर्ण शांतता

CD

मानखुर्द, ता. १२ (बातमीदार) ः मानखुर्दच्या म्हाडा वसाहतीमध्ये रविवारी (ता. १०) रात्रीच्या घटनेनंतर सोमवारी तणावपूर्ण शांतता दिसली. अनूचित घटना टाळण्यासाठी मानखुर्द पोलिसांनी खबरदारी घेत कडक बंदोबस्त ठेवला होता. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दिली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव कोळी यांनी सांगितले.
मानखुर्दच्या म्हाडा वसाहतीमध्ये रविवारी रात्री एक गट रामनवमी असल्याने ‘जय श्रीराम’ अशी घोषणा देत दुचाकीवरून निघाला होता. रमजान महिना सुरू असल्यामुळे नमाज पठण करण्यात या घोषणांनी व्यत्यय येत असल्याचे निदर्शनास आणून देत स्थानिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाद झाला व त्यानंतर हाणामारी झाली. त्यामध्ये दोन्ही गटातील काही जण जखमी झाले. त्यानंतर अनोळखी टोळक्याने काठी, लोखंडी रॉड व धारदार शस्त्राच्या सहाय्याने परिसरात दहशत माजवत सुमारे २० ते २५ वाहनांची तोडफोड केली.
घटनेतील दोन्ही गटांनी एकेमकांविरोधात मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या वाहनांची तोडफोड करणाऱ्या अज्ञात टोळक्यांविरोधात अब्दुल्ला शेख यांनी तक्रार केली आहे. त्यांच्या चुलत भावाच्या उपजीविकेचे साधन असलेल्या रिक्षाचे या घटनेत नुकसान झाले. या घटनेनंतर उच्चपदस्थ पोलिस अधिकारी, स्थानिक आमदार अबू आझमी, भाजपचे ईशान्य मुंबई अध्यक्ष ॲड. विजय रावराणे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना शांततेचे आवाहन केले. मानखुर्द पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT