मुंबई

बेशिस्त रिक्षाचालकांना दणका

CD

कल्याण, ता. १२ (बातमीदार) ः कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर बेशिस्त रिक्षाचालकांचा वावर वाढला आहे. त्यांच्याविरोधात कल्याण पश्चिम वाहतूक पोलिस आणि कल्याण आरटीओच्या पथकाकडून कारवाई करत तीन लाख १९ हजार ८०० एवढा दंड वसूल करण्यात आला.
वाढीव रिक्षा भाडे घेणे, प्रवाशांना उद्धट बोलणे, गणवेशाचा नियम न पाळणे, लायसन, परमिट, बॅच, कागदपत्रे नसणे आदी कारणांवरून बेशिस्त रिक्षाचालकांवर आज कारवाई करण्यात आली. कल्याण पश्चिम वाहतूक पोलिस आणि कल्याण आरटीओ यांच्या पथकाने स्टेशन परिसरात ४०० हून अधिक रिक्षाची तपासणी केली. त्यातील ६६ बेशिस्त रिक्षाचालकांना दणका देत त्यांच्याकडून तीन लाख १९ हजार ८०० रुपये एवढा दंड वसूल केल्याची माहिती कल्याण वाहतूक विभाग वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.
कारवाईमुळे रिक्षाचालक आणि रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईदरम्यान स्टेशन परिसरात काही प्रमाणात रिक्षांचे प्रमाण कमी होते; मात्र वाहतूक पोलिस आणि आरटीओचे पथक तेथून जाताच पुन्हा रिक्षांची संख्या वाढली. त्यामुळे आरटीओने फक्त एका दिवसाच्या कारवाईचा देखावा न करता येथे नियमित कारवाई करून बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवावे, असे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.
रिक्षाचालकांनी प्रवशांशी सौजन्याने वागावे. योग्य कागदपत्रे सोबत ठेवावीत आणि गणवेश घालावा. नियमभंग करणाऱ्यांविरोधात भविष्यातदेखील कारवाई सुरू राहणार आहे.
- महेश तरडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT