crime  Sakal
मुंबई

कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्याच्या अंगावर मानवी विष्टा फेकून केली मारहाण

आधारवाडी कारागृहात कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्याच्या अंगावर मानवी विष्टा फेकून त्यांना मारहाण केली. त्यानंतर स्वतःवरही पत्र्याने वार करीत जखमी करून घेतल्याची घटना घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

आधारवाडी कारागृहात कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्याच्या अंगावर मानवी विष्टा फेकून त्यांना मारहाण केली. त्यानंतर स्वतःवरही पत्र्याने वार करीत जखमी करून घेतल्याची घटना घडली आहे.

डोंबिवली - आधारवाडी कारागृहात कैद्यांनी (Prisoners) तुरुंग अधिकाऱ्याच्या (Jail Officer) अंगावर मानवी विष्टा फेकून त्यांना मारहाण (Beating) केली. त्यानंतर स्वतःवरही पत्र्याने वार करीत जखमी करून घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तुरुंग अधिकारी रोहित बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडकपाडा पोलिस ठाण्यात कैदी लखन जाधव व रवींद्र भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण आधारवाडी कारागृहात बुधवारी सकाळी ११.१५ वाजण्‍याच्या सुमारास ही घटना घडली. तुरुंग अधिकारी बाविस्कर हे सर्कल नं. ७ मंडल कार्यालयाजवळ आले असता लखन व रवींद्र यांनी पूर्व नियोजित कट करून मानवी विष्टा त्यांच्या अंगावर फेकली व हल्ला केला. कैद्यांनी हल्ला केल्याचे पाहून इतर अधिकारी तेथे येताच या दोन कैद्यांनी जुन्या लोखंडी धारदार पत्र्याच्या तुकड्याच्या साह्याने स्वतःच्या मानेवर, गळ्यावर जखमा करून घेतल्या. याप्रकरणी दोन्ही कैद्यांविरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल खोंडे हे अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT