मुंबई

आगामी मराठी साहित्य संमलेन मुंबईत?

CD

नमिता धुरी : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : ९५ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ उदगीर येथे पार पडल्यानंतर ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’चे व्यवस्थापकीय कार्यालय मुंबई मराठी साहित्य संघाकडे येणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडणारे ९६ वे संमेलन ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ येथे व्हावे यासाठी संग्रहालयातर्फे महामंडळाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया’ची स्थापना १ ऑगस्ट १८९८ रोजी झाली. लवकरच संग्रहालयाचे १२५ वे वर्ष सुरू होणार आहे. यानिमित्त जे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, त्यात संमेलनाचाही विचार करण्यात आला आहे. साहित्य महामंडळाचे व्यवस्थापकीय कार्यालय प्रत्येक घटक संस्थेकडे तीन वर्षांच्या मुदतीसाठी असते. ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, पुण्याची ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’, नागपूरचे ‘विदर्भ साहित्य संघ’, औरंगाबादची ‘मराठवाडा साहित्य परिषद’ या महामंडळाच्या घटक संस्था आहेत. या क्रमानुसार २०२२-२३ या वर्षापासून ‘मुंबई मराठी साहित्य संघा’कडे व्यवस्थापकीय कार्यालय येणार आहे. त्यामुळे ९६ वे संमेलन साहित्य संघातर्फे आयोजित केले जाईल. यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासह परळी आणि विदर्भ साहित्य संघ यांनी प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.

एखाद्या संस्थेला संमेलन आयोजित करायचे असल्यास तशी त्या संस्थेची क्षमता असावी लागते. संमेलनासाठी येणाऱ्या निमंत्रित पाहुण्यांची राहण्याची सोयही तेथे होणे आवश्यक असते. संमेलनासाठी आलेल्या प्रस्तावांनुसार जागेची पाहणी केली जाते व त्यानंतर निर्णय घेतला जातो. ९६ व्या संमेलनासाठी आलेले प्रस्ताव साहित्य संघाकडे सुपूर्द केले जाणार आहेत. आवश्यक ते निकष पूर्ण झाल्यास मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात संमेलन होऊ शकते.
…….
याआधी १९९९ साली झाले संमेलन
यापूर्वी मुंबईत १९९९ साली शिवाजी पार्क येथे ७२ वे संमेलन झाले होते. त्यावेळी कवी वसंत बापट हे अध्यक्ष व मनोहर जोशी हे स्वागताध्यक्ष होते. महामंडळाचे कार्यालय ‘मुंबई मराठी साहित्य संघा’कडे १९८६, १९९८ आणि २०१० या साली तीन-तीन वर्षांकरता आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT