मुंबई

लिडार सर्वेक्षणाला वेग

CD

वाशी, ता. १६ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रात वर्षभर चर्चेत असलेल्या लिडार सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून सर्वेक्षणाचे काम ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कामावर पालिका आयुक्तांनी लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच शहरातील सर्व मालमत्तांचे लाइट डिटेक्शन अ‍ॅन्ड रेजिंग टेक्नॉलॉजी अर्थात लिडार सर्वेक्षण होत असून आगामी आर्थिक वर्षांत मालमत्ता कराची देयकेही या नव्या सर्वेक्षणानुसारच देण्यात येणार आहेत. महापालिकांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत हा मालमत्ता कर असतो. प्रत्येक मालमत्तेवर योग्य कर आकारणी व त्याची वसुली केली तरच शहराच्या मालमत्ता करामध्ये वाढ होऊन शहर विकासासाठी, नागरी सुविधांची कामे करता येणार आहेत. १९९२ मध्ये पालिका अस्तित्वात आल्यापासून शहरात मालमत्तांची प्रचंड वाढ झाली आहे. त्या पटीत मालमत्ता करांमध्ये वाढ झाली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन हे सर्वेक्षण करीत आहे. यामुळे शहरातील मालमत्तांची ठोस आकडेवारी प्राप्त होणार आहे.
महापालिकेच्या अभिलेखाप्रमाणे शहरात फक्त ३ लाख २३ हजार मालमत्ता असून त्यावर कर आकारणी होत आहे. ज्या मालमत्ता भाड्याने दिल्या आहेत. अशा मालमत्तांवर पालिकेच्या नियमानुसार मालमत्ता आकारणी न होता सरळ पद्धतीने कर आकारणी केली जात आहे. नेरूळ, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, वाशी, तुर्भे येथे सिडकोने बांधलेल्या बैठ्या घरांचे रूपांतर तीन ते पाच मजली इमारतींत झाले आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या रहिवासी इमारतीत विनापरवाना वाणिज्य वापर केला जात आहे. मात्र त्यावर नियमानुसार कर आकारणी होत नाही. त्यामुळे पालिकेचा महसूल बुडत आहे. या सर्वेक्षणामुळे शहरात नेमक्या किती मालमत्ता आहेत, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

८०४ कोटींचे लक्ष्य
मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून २०२२-२३ मध्ये मालमत्ता करातून ८०४ कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. उत्पन्न वाढीत लिडार सर्वेक्षण महत्त्वाचा घटक ठरणार आहे. आगामी आर्थिक वर्षांतील मालमत्ता कर देयके या सर्वेक्षणानुसार देण्यात येणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्व मालमत्तांचे लिडार सर्वेक्षण केले जात असून संबंधित कामाला सुरुवात झाली आहे. हे काम ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्पन्नातही निश्चित वाढ होणार असून याबाबत लवकरच एक बैठक घेतली जाणार आहे.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT