मुंबई

‘पोलखोल मोहिमे’ची भाजपकडून सुरुवात

CD

मुंबई, ता. १८ ः महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा भ्रष्टाचारी कारभार उघड करण्यासाठी मुंबई भाजपने मोहीम सुरू केली असून या पोलखोल मोहिमेची सुरुवात रविवारी गोरेगावच्या पत्राचाळीपासून करण्यात आली.
या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, अमित साटम, योगेश सागर आदी उपस्थित होते. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातही शिवसेनेने भ्रष्टाचार केल्यामुळे तेथील रहिवासी रस्त्यावर आल्याचा भाजपचा आरोप आहे. याच प्रकरणात नुकतीच ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नातलगांच्या ११ मालमत्तांवर टाच आणली आहे. त्यामुळे भाजपने ही मोहीम पत्राचाळीपासूनच सुरू केली. या वेळी पोलखोल मोहिमेच्या रथाचेदेखील उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी आयोजित सभेत भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या भ्रष्टाचारी कारभारावर टीका केली. यापुढे शिवसेनेचे इतर भ्रष्टाचारही या मोहिमेतून उघड केले जातील, असेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT