jumbo covid center
jumbo covid center sakal
मुंबई

मुंबईसह उपनगरातील जम्बो कोविड केंद्रांना लवकरच गूडबाय

भाग्यश्री भुवड

मुंबईसह उपनगरातील कोविड रुग्ण कमी झाल्यानंतर पालिकेने महत्त्वाचे तीन जम्बो कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई - मुंबईसह (Mumbai) उपनगरातील कोविड रुग्ण (Covid Patients) कमी झाल्यानंतर पालिकेने (Municipal) महत्त्वाचे तीन जम्बो कोविड केंद्र (Jumbo Covid Center) बंद (Close) करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासून तिथे एकही रुग्ण दाखल करण्यात आलेला नाही. त्यानंतर आता मुंबईतील नेस्को जम्बो, दहिसर आणि कांजूरमार्ग या तीन जम्बो केंद्रांना लवकरच ‘गूड बाय’ करण्याची वेळ आली आहे.

तिन्ही जम्बो केंद्रे लवकरच बंद करण्यात येणार असल्याने, हळूहळू या मोठ्या कोविड केंद्रांतील सामान शिफ्ट केले जात आहे. ‘सकाळ’ने घेतलेल्या नेस्को जम्बो कोविड केंद्राच्या आढाव्यात अजूनही बरेचसे सामान शिफ्ट करायचे बाकी असल्याचे निदर्शनास आले. सध्या पालिकेच्या उपनगरीय आणि प्रमुख रुग्णालयांतून या सामानाबाबतची मागणी करण्यात आली आहे. गरजेनुसार हे सामान त्या त्या रुग्णालयात शिफ्ट केले जात आहे.

‘शुभेच्छांमुळे आम्ही भारावलो’

१) नायर रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. शैली डेडिया या मे २०२० पासून नेस्को जम्बो कोविड केंद्राच्या औषध विभागात काम करत आहेत. त्यांच्या या कोविड केंद्रासोबतच्या बऱ्याचशा भावना जोडल्या गेल्या आहेत. जे कोविड रुग्ण या केंद्रातून बरे होऊन परतले, त्यांनी आपल्याला दिलेल्या चांगल्यातल्या चांगल्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात दानही केले. रुग्णांनी अनेकदा फूल, प्रमाणपत्र देऊन आणि उपचारांच्या बदल्यात आमच्यावर झालेल्या शुभेच्छांमुळे आम्ही भारावून गेले होतो.

२) रुग्णांना एक दिवसही औषधांची कमी भासू नये, यासाठी वेळोवेळी नियोजन केले जात होते. दुसऱ्या लाटेत चार शिफ्टमध्ये औषधे उपलब्ध करून दिली जात होती. कारण, पहिल्या आणि तिसऱ्या लाटेच्या तुलनेत तेव्हा जास्त रुग्ण दाखल झाले होते. हा कालावधी खूप कठीण होता. कारण, पहिल्या लाटेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त होते. पण, दुसऱ्या लाटेत रुग्णांचा भार जास्त होता. रुग्णांची सेवा केल्याने ते खूष होऊन गेले, त्यातच त्यांना समाधान वाटत असल्याची भावना डॉ. डेडिया यांनी व्यक्त केली.

५० ते १०० डॉक्टर अखेरपर्यंत

नायर रुग्णालयातील डॉ. अपर्णा ठाकूर यांना कोविड केंद्रात डॉक्टर नियुक्तीचे काम देण्यात आले होते. दुसऱ्या लाटेत डॉक्टरांची मागणी वाढली होती. एका शिफ्टमध्ये ७० रुग्णांसाठी २ डॉक्टर अशी नियुक्त केली गेली. दुसऱ्या लाटेत ३०० ते ३५० डॉक्टरांची नियुक्ती केली गेली होती. रुग्ण व्यवस्थापनाचा मोठा भाग डॉ. ठाकूर यांनी सांभाळला. कोविडमुळे रुग्णासोबत नातेवाईक नसायचा. त्यामुळे रुग्णांना समुपदेशनाची गरज होती. अशा रुग्णांचे ऑनलाईन समुपदेशन केले. काही डॉक्टर्स मध्येच त्यांच्या सोयीनुसार काम सोडत होते; परंतु ५० ते १०० डॉक्टर असे होते जे नेस्कोच्या पूर्ण प्रक्रियेत अखेरपर्यंत राहिले. या सर्वांत रुग्णाने दिलेला सकारात्मक प्रतिसाद महत्त्वाचा ठरला. त्यातून झालेल्या कौतुकामुळे काम करण्याची ऊर्जा मिळत होती, असे डॉ. ठाकूर यांनी सांगितले.

२६,५६७ रुग्णांवर उपचार

१) जम्बो कोविड केंद्रांमध्ये मे २०२० पासून २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत २६ हजार ५६७ रुग्णांवर उपचार केले; तर २३ हजार ५६६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यात जवळपास ७०० रुग्णांचा मृत्यू झाला. जम्बो कोविड केंद्रात एकूण १८५ व्हेंटिलेटरची सुविधा होती; पण आता एकूण १५० व्हेंटिलेटर्स बाकी आहेत.

२) सर्व सामानासाठी केईएम, नायर, सायन आणि नायर दंत शासकीय महाविद्यालये, प्रसूतिगृहे, छोट्या दवाखान्यांमधून मागणी करण्यात आली आहे. हे सामान पुरवण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून लवकरच ते इतर रुग्णालयांमध्ये शिफ्ट केले जाणार आहे. या जम्बो केंद्रात एकूण २,७९३ सामान्य खाटा आणि २०६ आयसीयू खाटांचा समावेश होता. पिडियाट्रिकसाठी ९० खाटांची सोय करण्यात आली होती.

२ जून २०२० ला मी इथे रुजू झाले आणि तेव्हापासून आतापर्यंत आम्ही पूर्ण ताकदीनिशी काम केले. फेब्रुवारीपर्यंत येथे २६,५६७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. इतरांच्या तुलनेत आमचा मृत्युदर सर्वात कमी आहे. आम्ही टीम म्हणून लढलो आणि जीव वाचवल्याचा आनंद आहे.

- डॉ. नीलम अंद्राडे, संचालक, प्रमुख वैद्यकीय रुग्णालये व नेस्को अधिष्ठाता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT