मुंबई

लिंबू सरबतही महागले

CD

म्हसळा, ता. २४ (बातमीदार) : उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असताना वाढत्या पार्‍याप्रमाणे लिंबाचेही भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. किराणा मालासह तेल, तसेच भुसारी, डिझेलनंतर लिंबानेही आता भाव खाल्ला आहे. काही दिवसांत दुपटीने भाववाढ होऊन प्रति शेकडा लिंबाचा भाव १००० ते १२०० रुपये झाला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी लिंबाकडे पाठ फिरवली आहे.
काही दिवसांपासून लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक लिंबू १२ ते २० रुपयांना विकले जात आहे. ग्राहकांनी वाढलेल्या किमतीमुळे लिंबू घेणेच बंद केले असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. काही दिवसांपूर्वी ११०० रुपयांना लिंबाची गोणी होती. आता त्या गोणीची किंमत ७५oo ते ८००० रुपये झाल्याचे विक्रेत्याने सांगितले. उन्हाळ्यात लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातच पवित्र रमजान सुरू असल्याने सरबतासाठी लिंबाला मोठी मागणी असते. उसाचा रस विक्रेत्यांनी, आम्ही घाऊक खरेदी करत असल्याने एक लिंबू साधारणतः ५ ते ६ रुपयांना मिळतो. त्यामुळे उसाच्या रसात लिंबू टाकताना कोणतीही काटकसर करत नसल्याचे सांगितले.

सरबत विकणे बंद
अनेक विक्रेत्यांनी तर लिंबाचे सरबत बंद केल्याचे सांगितले. किरकोळ बाजारात जर लिंबू १० ते १५ असेल, तर सरबत ३० रुपयांना विकण्याची वेळ येऊ शकते. लिंबू सरबतचे भाव वाढवल्याने अनेकदा ग्राहकांसोबत भांडणे होत असतात. परिणामी, नाईलाजाने लिंबू सरबत विकणे बंद करणेच पसंत केल्याचे सरबत विक्रेत्यांनी सांगितले.

ग्राहक पैशांचा विचार करत नाही.
उसाचा रस १० रुपये हाफ, तर १५ रुपये फुल ग्लास दराने विक्री होतो. मात्र, वाढलेल्या इंधन आणि लिंबाच्या दराने आता २० रुपये हाफ, तर ३० रुपये फुल या दराने उसाच्या रसाची विक्री होत आहे. मात्र, अंगाची लाहीलाही होत असल्याने ग्राहक पैशांचा विचार न करता उसाच्या रसावर तहान भागवत आहेत, असे उस रस विक्रेत्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT