पालघर जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेचे चटके प्रचंड प्रमाणात सहन करावे लागत आहेत esakal
मुंबई

पालघर जिल्ह्याला उष्णतेचे चटके

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत. त्यातच मधुमेही, रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना अधिक त्रास होत आहे. तसेच नागरिकांची भूकदेखील मंदावू लागली

सकाळ वृत्तसेवा

वसई : पालघर जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेचे चटके प्रचंड प्रमाणात सहन करावे लागत आहेत. त्यामुळे चक्कर येणे, डोकेदुखीचा त्रास होणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत. त्यातच मधुमेही, रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना अधिक त्रास होत आहे. तसेच नागरिकांची भूकदेखील मंदावू लागली आहे. म्हणून अनेक नागरिक प्रवास करणे टाळत आहेत, तर काही जण समुद्रकिनाऱ्याला विसावा घेणे पसंद करत आहेत.

पालघर जिल्हा हिरवागार असला तरी उष्णतेचा परिणाम दोन दिवसांपासून अधिक प्रमाणात जाणवत आहे. जिल्ह्यातील डहाणू, बोईसर, मनोर, तलासरी, जव्हार, विक्रमगड, मोखाडा, वसई-विरार, सफाळे, केळवे, बोर्डी, पालघर आदी भागात शुक्रवारी व शनिवारी ४१ अंश तापमानाची नोंद झाली. प्रचंड तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे; तर जनावरांवरदेखील याचा परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांना सावली मिळावी म्हणून छावणी बांधून आधार दिला जात आहे. अति उष्णतेमुळे त्वचेचे आजार उद्भवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. साखरेचे प्रमाण वाढणे, रक्तदाब कमी जास्त होणे, असे प्रकार वाढू लागल्याने नागरिकांना इस्पितळाची पायरी चढावी लागत आहे.

वसई ते मनोर महामार्गावर प्रवास करताना उष्णतेच्या झळा प्रचंड लागत आहेत. त्यातच रात्रीच्या वेळी प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना झोप लागत नाही. दूरचा प्रवास केल्यावर चक्कर येते म्हणून दुपारच्या वेळेस प्रवास करणे शक्यतो टाळत आहोत.
- दिनेश कडुलकर, वसई

उष्णता अधिक असल्याने नागरिकांनी शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल साधावा. कोणतेही आजार उद्भवत असतील तर त्वरित त्यावर नजीकच्या रुग्णालयात जाऊन त्यावर उपचार घ्यावेत. मधुमेही, रक्तदाब असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी.
- डॉ. राजेश चौहाण

एसी, कुलरची मागणी वाढली
घरात पंखे जरी असले तरी प्रचंड तापमानामुळे गार वारा मिळत नाही. त्यामुळे गरमीपासून बचाव करण्यासाठी एसी, कुलर खरेदीसाठी पालघर जिल्ह्यातील दुकानात गर्दी वाढू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT