मुंबई

खर्डीकरांना सोनाई-सिताई यात्रेचे वेध

CD

खर्डी, ता. २४ (बातमीदार) ः ठाणे जिल्ह्यात नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असणाऱ्या खर्डीच्या सोनाई-सिताई मातेची यात्रा गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे झाली नव्हती; पण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यात्रेचे वेध भाविकांना लागले आहेत. २८ एप्रिल ते ३ मे दरम्यान ही यात्रा (बोहाडा) आयोजित करण्यात आली आहे. खर्डीच्या यात्रेला ‘बोहाडा’ असेही म्हणतात.

चैत्र शुद्ध पौर्णिमेला देवीच्या काठीचे (ढोलकाठी) गावात आगमन झाले आहे. ढोलकाठीची पूजा करून मिरवणुकीने वाजत-गाजत देवीच्या मंदिरात आणली गेली. सोनाई-सिताई देवीची यात्रा पाच दिवस आणि रात्र सुरू असते. यात्रेत पारंपरिक पद्धतीने देवदेवतांची पात्ररूपी सोंगे नाचविली जातात. ऐन उन्हाळ्यात ही यात्रा होत आहे. रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महावितरणला निवेदन देण्यात आले. तसेच, यात्रेत कायदा व सुव्यवस्था चोख राहण्यासाठी व इतर सुविधा मिळण्यासाठी तहसीलदार, पोलिस निरीक्षक, पाणीपुरवठा विभाग, गटविकास अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना खडी ग्रामपंचायत व देवालयातर्फे निवेदन देण्यात आले आहे.
------------
शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन
शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार वसावे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या उपस्थितीत खर्डी पोलिस दूरक्षेत्राच्या आवारात २६ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता शांतता कमिटी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. खर्डीच्या नवसाला पावणाऱ्या सोनाई-सिताई देवीच्या यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena: शिवसेनेत मोठे बदल होणार! 'काम करा नाहीतर पद सोडा...'; पदाधिकाऱ्यांना कडक इशारा, पडद्यामागे काय घडतंय?

Mumbai News: मुंबईकरांसाठी गूडन्यूज! १२ डब्यांच्या २३८ नव्या लोकल खरेदी करणार; १९ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Gokul dairy election news : गोकुळ दूध संघाची निवडणूक लांबणीवर, १२०० दूध संस्थांच्या निर्णयानंतरच निवडणुका; कोर्टाने दिले थेट आदेश

लक्ष्मीकांत बेर्डेंचं गाजलेलं नाटक 'शांतेचं कार्टं चालू आहे' पुन्हा रंगभूमीवर ! प्रियदर्शन-विशाखाची रंगणार जुगलबंदी

Agniveer MR Musician Recruitment 2026 : आता संगीतकार बनू शकतात अग्निवीर! भारतीय नौदलात भरती होण्याची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT