मुंबई

दुबार भातशेती बहरली

CD

कासा, ता. २४ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील अनेक शेतकरी सूर्या प्रकल्पामधील धामणी व कवडास या धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातील पाण्यावर भातशेतीची लागवड करतात. त्यात अनेक शेतकरी भाजीपाला व फुलशेतीचे देखील उत्पन्न घेतात. सध्या कासा, चारोटी सारणी, तवा, सोनाळे, वाघाडी, वेती, रानशेत परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात भातशेती बहरली असून काही दिवसांत कापणीस सुरुवात केली जाणार आहे.

मागील वर्षात कोरोनाचे संकट असल्याने अनेक शेतकरी आपल्या भातशेतीत मग्न झाले होते. मागे अनेक शेतकरी शेतीकडे जास्त लक्ष देत नव्हते. पण आता अनेक शेतकरी मन लावून शेतीत मेहनत करीत आहेत. उन्हाळी शेतीत पावसाळ्यात लागवड केलेल्या शेतीपेक्षा उत्पन्नदेखील जास्त मिळते. तसेच अतिवृष्टी, रोगराई यांची कोणतीही भीती नसते.

या कालव्याच्या पाण्यातून डहाणू परिसरातील दुबार भातपिके तयार झाली आहेत. काही दिवसांतच त्यांच्या कापणीला सुरुवात होणार आहे. मे १५ पर्यंत कालव्याला पाणी सोडले जाणार आहे, असे सूर्या पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
-----
कोट
दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. दुसरे कोणतेही उत्पन्न, जोडधंदा करता येत नाही. त्यामुळे सध्या शेतीतून मिळणारे धान्य हाच आधार आहे. थोड्याफार प्रमाणात भाजीपाला लागवड करून जेमतेम उदरनिर्वाह सुरू आहे.
- नरेश घाटाळ, शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्या निम्मित कांजूरमार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे प्रदर्शन

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT