मुंबई

डिझेल चोरट्याला ट्रेलर चालकांची बेदम मारहाण

CD

नवी मुंबई, ता.२४ (वार्ताहर): उरणच्या जासई परिसरात उभ्या असलेल्या ट्रेलरच्या टाकीतील डिझेल चोरताना पकडल्या गेलेल्या अभिजित भानुदास सूर्यवंशी (३३) या चोरट्याला ट्रेलर चालकांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या मारहाणीत सदर चोरटा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत उरण पोलिसांनी जखमी अभिजितसह त्याच्या साथीदारावर डिझेल चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला बेदम मारहाण करणाऱ्या ट्रेलर चालकाविरोधातदेखील गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील जखमी अभिजित हा मानखुर्द येथे राहण्यास असून त्याच्या मालकीची स्विफ्ट डिझायर कार आहे. सदर कार तो ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी वापरतो. काही वर्षांपूर्वी त्‍याची ओळख सैराज याच्यासोबत झाल्याने २१ एप्रिल रोजी रात्री तो सैराज याला भेटण्यासाठी उलवे येथे आला होता. त्यानंतर दोघेही पहाटे २ वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कारने जासई येथे गेले होते. त्यानंतर या दोघांनी सहारा हॉटेल शेजारी उभ्या असलेल्या ट्रेलरच्या डिझेल टाकीचे लॉक तोडून त्यातून डिझेल चोरी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, सदर प्रकार ट्रेलर चालकाने पाहिल्यानंतर आरडाओरड सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Schedule: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई-पुणे आणि मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार; १ जानेवारीपासून अंमलबजावणी

Smriti Mandhana: '... तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही' हरमनप्रीत कौरला स्मृतीने का दिलेली धमकी?

High demand skills: 2026 मध्ये करा हे फ्री ऑनलाईन कोर्स; लाईफ होईल सेट

Vodafone Idea AGR dues : वोडाफोन-आयडियाला सरकारचा दिलासा, तरीही शेअर्स कोसळले!₹87,695 कोटींच्या AGR ला मुदतवाढ; नेमकं काय घडलं?

Dhule Municipal Election : धुळ्यात निवडणुकीचा धुरळा! ७४ जागांसाठी ७४९ अर्ज; भाजपचा मित्रपक्षांसह विरोधकांना 'ओपन चॅलेंज'

SCROLL FOR NEXT