मुंबई

२७ वर्ष नांदले, आता नळावरची भांडणे सुरू!

CD

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. २४ ः राज्यात महागाई, बेरोजगारी यांसारखे प्रश्न जटील होत असताना शिवसेना-भाजप मात्र जात-धर्माच्या मुद्द्यांवर राजकारण करत आहेत. २७ वर्षे शिवसेना-भाजप एकत्र नांदली आणि आता नळावरची भांडणे करीत आहे. मात्र महागाईने, बेरोजगारीने होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेला या डोंबाऱ्याच्या खेळात कोणताही रस नाही, असा टोला आम आदमी पक्षाने (आप) लगावला आहे. देशात वाढलेली महागाई कमी झाली पाहिजे, रोजगार वाढले पाहिजेत, यासाठी आप लढा देईल. रोटी, कपडा, मकान, आरोग्य, शिक्षण याभोवती आमचे राजकारण असेल, असे आपचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने कोव्हिड काळात कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या २५० कर्मचाऱ्यांचे काम थांबविले आहे. या तरुणांची भेट घेण्यासाठी धनंजय शिंदे हे रविवारी डोंबिवलीत आले होते. पश्चिमेतील स्वामी विवेकानंद राणाप्रताप शाळेत या युवकांची व आपच्या कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीला अवधूत दीक्षित, धनंजय जोगदंड, विनय दुबे उपस्थित होते. बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यात शिवसेना-भाजपच्या सुरू असलेल्या वादावर टीका केली.
केडीएमसीने पालिका रुग्णालयांत कोरोना रुग्णांची सेवा केलेल्या २५० कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. या कामगारांना २४ तास आधी नोटीस देत अचानक बेरोजगार केले. आयुक्तांच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. कोरोना काळात काम केलेल्या सर्वांच्या योगदानामुळे पालिकेला आज पुरस्कार मिळाला आहे. त्यामध्ये या कामगारांचाही मोलाचा वाटा आहे. त्यामुळे या बेरोजगार तरुणांना आम्ही संविधानिक मार्गाने न्याय मिळवून देणार आहोत. याविषयी सह्यांची मोहीम शहरात राबविणार असून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिले जाईल. येत्या १ मे ला कामगार दिनी मूक निदर्शने आम्ही या कामगारांसाठी करणार आहोत, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Shortage in India : पुढील 3 महिने गॅस सिलिंडर मिळणं कठीण? छगन भुजबळ यांनी दिला धोक्याचा इशारा, पाहा काय आहे कारण?

Land Scheme: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! गरीबांसाठी घराचा मार्ग मोकळा; महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

SCROLL FOR NEXT