मुंबई

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची वार्षिक सभा

CD

बोर्डी, ता. २४ (बातमीदार) ः सेवानिवृत्त कर्मचारी संघटना बोर्डी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. २३) बोर्डी येथील आत्माराम पंत सावे सभागृहात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र वझे, राज्याचे सल्लागार समिती सदस्य मारुती वाघमारे, उमा राऊत, प्रमुख अतिथी कोषाध्यक्ष किरीट पटेल उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या दोन वर्षांत निवृत्त कर्मचारी संघटनेच्या सदस्यांना एकत्र येण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे या सभेस सदस्यांची शंभर टक्के उपस्थिती होती. याप्रसंगी ७५ वर्षें पूर्ण केलेल्या सभासदांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यानच्या काळात संघटनेने रत्नागिरी-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना, तसेच कोरोना विषाणूच्या माहारामारीत बाधित झालेल्या नागरिकांना तहसीलदार डहाणू यांच्या विनंतीनुसार मोठी मदत केली आहे, अशी माहिती संघटनेचे बोर्डी शाखेचे अध्यक्ष भालचंद्र चुरी यांनी प्रास्ताविक भाषणात दिली. सभेचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र वझे व प्रमुख अतिथी मारुती वाघमारे यांनी भावी काळात निवृत्त कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर राऊत, शारदा राऊत यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT