मुंबई

भारनियमनाविरोधात ठाण्यात कंदिल आंदोलन

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता.२४ : देखभाल-दुरुस्तीच्या नावाने राज्यात भारनियमन सुरू असल्याचा आरोप करत भाजपने ठाण्यात रविवारी कंदील आंदोलन केले. वागळे इस्टेट येथील महावितरणच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात येत असलेली सुरक्षा अनामत रकमेचा निर्णय रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीच्या वागळे इस्टेट येथील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच राज्यातील जनतेला भारनियमनात ढकलल्यासंदर्भात निषेध व्यक्त केला. या आंदोलनात भाजपचे शहर सरचिटणीस मनोहर सुखदरे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, रमेश आंब्रे, बाळा केंद्रे, वीरसिंग पारछा, कृष्णा भुजबळ, विक्रम भोईर, ओमकार चव्हाण, भाजयुमोचे शहराध्यक्ष सारंग मेढेकर, महिला आघाडीच्या श्रुती महाजन, स्वप्नाली साळवी, श्रुतिका मोरेकर, सुषमा ठाकूर आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

Pune Solapur Highway: कदमवाकवस्तीत सेवा रस्त्यालगत कचरा; अपघातांचे सत्र अन् साथीच्या आजारांचा धोका, नागरिक संतप्त

Latest Marathi News Update : नागपुरातील ८ सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी; प्रत्येकी १० लाखांच्या खंडणीची मागणी, अभिनेता टायगर श्रॉफच्या उदाहरणाचा धाक

Bachchu Kadu : दिवाळी मदतीवरून बच्चू कडूंचा महायुती सरकारला घरचा आहेर, शेतकर्‍यांना 10 हजारांची मदत देण्याची मागणी

INDA vs NZA, Test: कठीण प्रसंगी जुरेल चमकला! ठोकले दमदार शतक, आकाश दीपचीही फिफ्टी; पण न्यूझीलंडच्या बॉयलकडून चोख प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT