मुंबई

आईवडिलांच्या पायाचे तीर्थ लतादीदींनी प्यायले होते!

CD

मुंबई, ता. २४ ः कट्टर मातृ-पितृभक्त असलेल्या लतादीदीने आणि तिच्या सांगण्यावरून मीदेखील आई-वडिलांच्या पायाचे तीर्थ प्यायले होते. ती प्रत्येक गाण्यापूर्वी बाबा मला सांभाळून घ्या, असे म्हणायची, अशी भावुक आठवण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सांगताच सभागृह गहिवरून गेले.
पं. दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार, तसेच प्रथमच दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचे वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. संगीत क्षेत्रातील मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार गायक राहुल देशपांडे यांना, चित्रपट सेवेसाठीचे विशेष मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांना, तर मास्टर दीनानाथ मंगेशकर आनंदमयी हा सेवा पुरस्कार मुंबईच्या डबेवाल्यांना देण्यात आला. आजच्या कार्यक्रमाला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ मंगेशकर आणि हरीश भिमानी यांनी केले.
उषा मंगेशकर यांच्याप्रमाणेच आशा भोसले यांनी लतादीदींच्या आठवणी तर सांगितल्याच, पण दीदींनी सर्वच पार्श्वगायिकांच्या हक्कांसाठी कसा संघर्ष केला, तेही सांगितले. गाण्याच्या रेकॉर्डवर पार्श्वगायकांचे नाव आले पाहिजे, श्रेयनामावलीतही पार्श्वगायकांचे नाव आले पाहिजे, त्यांना स्वामित्वधन (रॉयल्टी) मिळाली पाहिजे, या आग्रहासाठी तिने गाणे बंद करण्याची धमकीही दिली होती. जिथे पूर्वी भारतीयांना गाण्याची संधी मिळाली नव्हती. त्या लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये तसेच न्यूयॉर्कच्या कार्लिकी हॉलमध्येही गाणे गाऊन तिथे सर्व गायकांसाठी त्यांची दारे उघडली, अशीही आठवण आशा भोसले यांनी सांगितली.
----
आएगा आनेवाला
लता मंगेशकर यांना ज्या गाण्याने पहिले यश मिळाले, त्या ‘आएगा आनेवाला’ या गाण्याची आठवण सांगताना आशा भोसले यांनी ते स्वर गाऊनही दाखवले आणि सारे रसिक त्या आठवणीत बुडून गेले.
---
‘वेस्टर्न’वर वाहतूककोंडी
पंतप्रधान सांताक्रूझ विमानतळावरून दहा ते पंधरा मिनिटांत सभागृहात येतील आणि तसेच परत जातील, असे नियोजन होते. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

Pune News : राज्यातील ‘या’ चार विद्यापीठांच्या अधिनियमांत सुधारणेसाठी समिती स्थापन

Pravin Darekar: 'या' महिलांना महापालिकेची कामे द्यावीत, प्रविण दरेकर यांची मागणी

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

Tata Power: टाटाकडून मोठं गिफ्ट! तीन महिन्यात ४५ हजार घरात सौर प्रकाश

SCROLL FOR NEXT