मुंबई

‘सौहार्दसाठी सर्वधर्मीय प्रयत्नांची गरज’

CD

मुंबादेवी, ता. २५ (बातमीदार) ः देशातील सौहार्द टिकविण्यासाठी सर्व धर्मीयांनी प्रयत्न करणे फार गरजेचे असून बौद्ध धर्मीय आणि हिंदू धर्मीय जेव्हा रमजानमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करतात त्यातूनच सामाजिक सलोखा आणि गंगा-जमनी तहजीब टिकून राहते, असे मुंबादेवी विधानसभेचे आमदार अमीन पटेल यांनी म्हटले आहे.
अस्तित्व आणि दक्षिण मुंबई युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस विनय साळुंखे यांनी रविवारी (ता. २४) सायंकाळी जे. जे. पालिका बी वार्ड कर्मचारी वसाहत येथे आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत हे उद्‍गार काढले. या इफ्तार पार्टीत जवळपास ३०० रोजेदार मुस्लिम बांधवांनी सहभागी होत खजूर, पाणी आणि फलाहार घेत रोजा सोडला. याप्रसंगी हिना गजाली, मंदार पवार आणि मुस्लिम मौलवी उपस्थित होते. आम्ही देशातील धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांविरोधात आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर देश चालतो आहे. आपल्या देशात सदैव शांतता नांदावी म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, असे विनय साळुंखे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Marathi News Live Updates : कऱ्हाडला नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद; पोलिस बंदोबस्तातही वाढ

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT