भिवंडीत पोलिसांतर्फे इफ्तार पार्टी
भिवंडीत पोलिसांतर्फे इफ्तार पार्टी sakal
मुंबई

भिवंडीत पोलिसांतर्फे इफ्तार पार्टी

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : पवित्र महिना रमजाननिमित्ताने शहरातील विविध ठिकाणी सामाजिक संस्था व राजकीय पक्षांच्या वतीने रोजा इफ्तारचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. भिवंडी शहरात परिमंडळ- २ अंतर्गत निजामपुरा पोलिस व शांतीनगर पोलिस ठाण्याच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे रविवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील मान्यवरांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्या मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून एकात्मता, भाईचारा या भूमिकेतून शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन त्यांचा कार्यक्षेत्रात केले जात आहे. पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुरा पोलिस ठाण्याच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार हा कार्यक्रम सायंकाळी बुबेरे हॉल सभागृहात आयोजित केला होता. निजामपुरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार, दीप बने यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी अतिथी म्हणून पालिका उपमहापौर इमरान खान, माजी महापौर गटनेते विलास पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील वडके, माजी नगरसेवक तारीक फारूकी, शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तुफेल फारूकी, मलिक मोमीन व अन्य मान्यवर, तसेच पोलिस कर्मचारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते. याशिवाय शांतीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Meta AI : व्हॉट्सअ‍ॅपवर कसं वापरायचं 'मेटा एआय'? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT