Jumbo-Hospital sakal
मुंबई

नवी मुंबई : जम्बो कोविड केअर केंद्र जूनपर्यंत?

२२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना सेवा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई: सिडकोने पनवेल महापालिकेला तयार करून दिलेले जम्बो कोविड केअर केंद्र महापालिकेने सिडकोला परत केले असताना नवी मुंबई महापालिकेने मात्र जम्बो कोविड केअर केंद्र सध्‍या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील कोविड रुग्णांची संख्या नगण्य असली, तरी येत्या जून महिन्यांत रुग्ण वाढीचा धोका लक्षा घेता हे केंद्र तूर्तास सुरू ठेवण्याचा पालिकेचा विचार आहे. मात्र या कोविड केअर केंद्रासाठी सिडकोतर्फे महापालिकेच्या मागे भाडे भरण्यासाठी तगादा लावला आहे.

नवी मुंबई शहरात मार्च २०२०ला कोविडच्या रुग्णाचा शिरकाव झाला. संपूर्ण शहर साथीच्या भोवऱ्यात आल्यानंतर रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यास खाटा कमी पडू लागल्या. रुग्णालये भरून गेली. आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेन्टीलेटर आदी सुविधांची समस्या निर्माण झाली. त्यामुळे महापालिकेने पुढाकार घेत वाशीतील सिडकोच्या भव्य प्रदर्शन केंद्रात जम्बो कोविड रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय केला. अवघ्या काही दिवसांत युद्ध पातळीवर हे केंद्र तयार करण्यात आले. ७ जून २०२० ला वाशी जम्बो कोविड केअर केंद्रात पहिला रुग्ण दाखल करण्यात आला.

सुरुवातीला ६०० खाटांचे असणाऱ्या या केंद्रात हळूहळू खाटांची संख्या वाढवत १२०० पर्यंत नेण्यात आली. जून २०२० ते २०२२ पर्यंत सलग दोन वर्षे या जम्बो कोविड केअर केंद्राने शहराला एखाद्या खासगी रुग्णालयालाही लाजवेल अशा मल्टिस्पेशालिटी सुविधा दिल्या. २८ मार्चला शेवटच्या कोविड रुग्ण बरा होऊन या केंद्रातून घरी परतला. तेव्हापासून कोविडची तिसरी लाट ओसरल्यानंतर आता या केंद्रात एकही रुग्ण शिल्लक नाही.
ेगेला महिनाभर केंद्रात कोविडचा एकही रुग्ण आला नाही. आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील इतर कोविड केअर केंद्र आणि कोविड रुग्णालये बंद केली आहेत. रुग्ण उपचारार्थ दाखल नसतानाही महापालिकेचा त्यावर सुरू असणारा खर्च पाहता प्रशासनातर्फेही काही खाटा कमी करून केंद्रातील काही जागा सिडकोच्या ताब्यात देण्याचा विचाराधीन आहे. परंतु जून महिन्यापर्यंत रुग्ण वाढीची संभाव्य धोका नजरेसमोर ठेवून पालिकेने सावध पवित्र घेतला आहे.

२२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना सेवा
वाशीतील जम्बो कोविड केअर केंद्रात ७ जून २०२० ला पहिला रुग्ण दाखल झाला. कोविडच्या तीनही लाटांमध्ये आत्तापर्यंत २२ हजार ७४१ रुग्णांना सेवा देण्यात आली. त्यापैकी १४ हजार १३० नॉन ऑक्सिजनवरील रुग्ण होते, तर ८ हजार ६११ रुग्ण हे ऑक्सिजनवर होते. यात ४५३ लहान मुलांचा समावेश आहे.

वाशीतील जम्बो कोविड केअर केंद्रातील काही खाटा कमी करून मोकळी जागा सिडकोला देण्याचा विचार सुरु आहे. रुग्णवाढीचा अंदाज लक्षात घेता जून महिन्यांपर्यंत केंद्राबाबत निर्णय घेतला जाईल.
अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई

पनवेल पालिकेला कोविड केंद्र केले परत
कळंबोली येथील कपास निगमच्या गोदामात सिडकोतर्फे पनवेल महापालिकेला तब्बल ५० कोटी रुपये खर्च करून जम्बो कोविड केअर केंद्र सुरू करून दिले होते. ऑक्सिजन, व्हेन्टीलेटर आणि आयसीयूच्या खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु या केंद्राचा एकही दिवस वापर न करता पालिकेने हे केंद्र सिडकोला परत केले आहे. अशा परिस्थितीत या केंद्राचे करायचे काय असा प्रश्न सिडकोसमोर पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Virat Kohli Santa Video : विराट कोहली नाताळादिवशी बनला सांताक्लॉज, मुलांना दिले भन्नाट गिफ्ट्स, व्हिडिओ व्हायरल

'धुरंधर'मधील २० वर्षीय अभिनेत्री आणि सचिन तेंडुलकर यांचा नेमका संबंध काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Uruli Kanchan Crime : आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : नांदेडच्या जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT