मुंबई

पालीत बॅनरबाजीला ऊत

CD

पाली, ता. २३ (वार्ताहर) : कोरोनानंतर दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा होत आहे. हजारोंच्या संख्येने भाविक पालीत दाखल होत आहेत. श्री गणेश जयंतीला बुधवारी (ता.२५) लाखोंच्या संख्येने भाविक पालीत येतील. अशा वेळी माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा, दुकाने व इमारतींवर, जागा मिळेल तिथे सर्वत्र मोठाले बॅनर व बॅनरच्या कमानी लावण्यात आल्या आहेत. अशा बॅनरमुळे पाली शहराला बकाल स्वरूप आल्याने स्थानिकांसह भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, स्वयंघोषित नेते यांचे माघी गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छांचे बॅनर व बॅनरच्या कमानी सर्वत्र झळकत आहेत. पालीमध्ये आधीच अरुंद रस्ता आहे. त्यात रस्त्यांच्या दुतर्फा बॅनर लावल्यामुळे रस्ता आणखी अरुंद वाटत आहे. यात वाहतुकीला मात्र अडथळा येत आहे. गणेश जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बॅनर्स लावल्यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. त्‍यावर स्थानिक नाराजी व्यक्त करत आहे. यातील अनेक जाहिराती या विनापरवानगी लावल्या असून त्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.

धार्मिक उत्सवात अशा बॅनरबाजीमुळे पालीला बकाल स्वरूप आले आहे. यामुळे पालीची प्रतिमा मलिन होत आहे. बॅनरबाजीवर पैसे घालवण्यापेक्षा भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी काही कामे व उपक्रम करणे गरजेचे होते.
- सुशील शिंदे, तरुण, पाली

पाली नगरात लागलेले सर्व बॅनर हे कोणत्या कारणासाठी लावले आहेत तेच कळत नाही. या बॅनरवरील कोणत्याच माणसाला मुंबई-पुणेवरून येणारे भाविक ओळखण्याची सुतराम शक्यता नाही. त्यापेक्षा येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी नगरसेवकांनी अथवा राजकीय पक्षांनी तो पैसा वापरण्याची गरज आहे.
- अनुपम कुलकर्णी, नागरिक, पाली

हे बॅनर लावण्यासाठी कोणीही नगरपंचायतींकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. यासाठी कोणताही निधी आमच्याकडे आलेला नाही. याबाबत आम्ही लवकरच कारवाई करणार आहोत.
- विद्या येरूणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rated Today: आठवड्याच्या शेवटी सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31 हजारांनी घसरलं; ताजा भाव पाहा

IND vs PAK Final: भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली! वैभव सूर्यवंशीसह ‘या’ खेळाडूंना Playing XI मध्ये संधी; पण पाकच्या कॅप्टनसोबत हात मिळवला का?

Miraj Incident : तीन मजली इमारतीवरून पडून दीड वर्षांचे बाळ गंभीर मिरज येथे मंगळवार पेठेतील घटना

Hidden Lakes in India: तलावाच्या काठावरचं हे जग पाहिलंय का? भारतातील ५ ठिकाणं पाहून थक्क व्हाल, लगेच कराल ट्रिप प्लॅन

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

SCROLL FOR NEXT