मुंबई

एसटीच्या ताफ्यात दहा नव्या लाल परी

CD

अलिबाग, ता. २१ (बातमीदार) ः कोरोना काळानंतर प्रवासी संख्येत घट झाल्‍याने एसटी महामंडळ तोट्यात आहे. नव्याने उभारी घेण्यासाठी आणि प्रवाशांना अधिकाधिक चांगल्‍या सुविधा देण्यासाठी परिवहन मंडळाचे प्रयत्‍न सुरू आहेत. त्‍यानुसार रायगड विभागासाठी दहा नवीन बस खरेदी करण्यात आल्‍या असून महाड व श्रीवर्धन आगारातून त्‍या धावतील.
पावसाळ्यात छतातून गळती, खिडक्यांच्या काचा, आसनव्यवस्‍था तुटलेल्‍या स्‍थितीतील बसमधून नागरिकांना प्रवास करावा लागतो. अनेकदा प्रवासादरम्‍यान बस नादुरुस्‍त होत असल्‍याने प्रवासी हैराण होतात. यावर उपाययोजना करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्‍नशील आहे. प्रवासी संख्या वाढविण्याबरोबरच उत्पन्नात वाढ करण्यासाठी महामंडळाने रायगड विभागाला दहा एसटी बस दिल्या आहेत.
सुयोग्य आसनव्यवस्‍था, मोबाईल चार्जिंगची सुविधा अशी खासगी-सरकारी भागीदारीत या बस देण्यात आल्‍या आहेत. या बसचा चालक खासगी असून वाहक एसटी महामंडळाचा असेल. अवघ्‍या काही दिवसांवर होळी येत आहे. होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. त्‍यामुळे या बस प्रवासासाठी उपयुक्‍त ठरतील, असे प्रवाशांकडून बोलले जात आहे.

जिल्ह्यामध्ये दहा एसटी बस दाखल झाल्या आहेत. श्रीवर्धन व महाड आगारात त्‍या पाठवल्‍या आहेत. या बस खासगी असून त्यावरील चालक खासगी तर वाहक एसटी महामंडळाचा असेल. बसमधून लांब पल्ल्याच्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येईल.
- दीपक घोडे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, रायगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT