मुंबई

जिल्हा कारागृहातील सीसी टीव्ही नादुरुस्‍त

CD

अलिबाग, ता. ८ (बातमीदार) ः जिल्हा कारागृहातील सीसी टीव्ही खराब झाले आहेत. त्याऐवजी नवीन सीसी टीव्ही बनवण्याचा प्रस्‍ताव असून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ५० लाख रुपयांच्या निधी अपेक्षित आहे. जोपर्यंत निधी मंजूर होणार नाही, तोपर्यंत जिल्‍हा कारागृहाची सुरक्षा रामभरोसे असल्‍याचे बोलले जात आहे.
अलिबाग येथील जिल्हा कारागृह ऐतिहासिक वास्तूमध्ये आहे. सरखेल कान्होजी आंग्रेकालीन वास्तूचे बांधकाम पूर्णतः दगडी आहे. कारागृहात २८० कैद्यांच्या क्षमता असून ८० महिला व २०० पुरुष कैद्यांचा समावेश आहे. कारागृहात २५ शिपाई, चार हवालदार व तीन अधिकारी कार्यरत असून दोन सुभेदार व एक अधिकारी अशी तीन पदे रिक्त आहेत.
कारागृहातून यापूर्वी दोन कैद्यांनी पलायन केले होते. सुरक्षेच्या दृष्टीने तत्कालीन जिल्हा कारागृह अधिक्षक सचिन चिकणे यांच्या कालावधीत सुमारे आठ कॅमेरे बसवण्यात आले होते. कैद्यांच्या प्रत्येक हालचालीवर या माध्यमातून लक्ष ठेवता येत होते. परंतु सीसी टीव्ही नादुरुस्‍त झाल्‍याने नवीन कॅमेरे बसवण्याचा निर्णय जिल्हा कारागृह अधीक्षक अशोक कारकरे यांनी घेतला आहे. कारागृहातील सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे त्‍यासाठी एकूण ५० लाख रुपयांचा निधीची मागणी केली आहे.

नव्या जागेत कारागृह स्थलांतरित
अलिबाग येथील जिल्हा कारागृह दगडांनी बांधले असून संपूर्ण कारागृह ३५ फूट तटबंदीचे आहे. सध्या २० ते ४० वयोगटातील कैदी हे खून, अत्याचार, चोरी गुन्ह्यातील आहे. जिल्हा कारागृहाची क्षमता २८० कैद्यांची आहे. परंतु दिवसेंदिवस वाढत्या गुन्ह्यांमुळे कारागृह कमी पडत आहे. त्यामुळे नव्या जागेसाठी अनेक वर्षांपासून मागणी सुरू आहे.

परहूरमध्ये ४.६६ हेक्‍टर जागा प्राप्त
जिल्हा प्रशासनानेही कारागृहासाठी नवीन जागेच्या मागणीला दुजोरा दिला असून अलिबाग तालुक्यातील परहूर या ठिकाणी ४.६६ हेक्टर इतक्या क्षेत्राची जागा प्राप्त झाली आहे. मोजणी झाल्यानंतर लवकरच ही जागा जिल्हा कारागृहाच्या ताब्यात मिळणार आहे. या जागेत ५०० कैद्यांची क्षमता असलेले कारागृह बांधण्यात येणार असल्याचे जिल्हा कारागृह अधीक्षक अशोक कारकरे यांनी सांगितले.

जिल्हा कारागृहातील जुने सीसी टीव्ही खराब झाले आहेत. त्याऐवजी नवीन सीसी टीव्ही बसवण्याचा प्रस्‍ताव असून जिल्हा प्रशासनाकडे ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. निधी मिळाल्यावर लवकरच सीसी टीव्ही बसवण्यात येतील.
- अशोक कारकरे, जिल्हा कारागृह अधीक्षक, अलिबाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT