Alibaug Crine Sakal
मुंबई

अलिबाग गाठले, मोबाईल फॉरमॅट केला अन्...; आईसह मुलाच्या मृत्यूचे गूढ उकलले

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी गुरुवारी (ता. ६) आईसह मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. सहा दिवसांनंतर या घटनेची वस्तुस्थिती पोलिस तपासातून समोर आली असून ही दुर्घटना नसून आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

काशीद समुद्रात डोर्थी बेंजामिन फेड्रिक (वय ७३) आणि विजय लिओनेल अल्फ्रेड (वय ४६) हे मूळचे तमिळनाडूतील असून ते काही वर्षांपासून कल्याण तालुक्यात वास्तव्यास होते. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश सकपाल यांनी सांगितले की, विजय यांची कोरोना काळात नोकरी गेली होती, तसेच दुसरी नोकरी शोधली होती; मात्र, काही कारणास्तव ती सुद्धा गेल्याने त्यांना आर्थिक टंचाई भासू लागली. यातूनच या दोघांनीही आत्महत्येचा विचार करून गुरुवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरून ते काशीदला निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी घरातील वस्तू विजयच्या मैत्रिणीकडे दिल्या होत्या. दोघेही गावाला जात असल्याने त्या वस्तू तिच्याकडे ठेवण्यास दिल्या, असा मैत्रिणीचा समज झाला होता. त्याचप्रमाणे विजयने आत्महत्येपूर्वी मोबाईल आणि लॅपटॉप फॉरमॅट करून ठेवला होता. काशीद येथे माय-लेक कार घेऊन आल्यावर सायंकाळी ७.४५ वाजता चिकणी समुद्र किनाऱ्यावरील कावडा या भागात बुडाले होते. त्यांचा मृतदेह कोणीही ताब्यात न घेतल्याने वाशी येथील शवागृहात ठेवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT