मुंबई

पिवळा धम्मक बहाव्याचे आकर्षक

CD

अमित गवळे, पाली

बहाव्याला पिवळी धम्मक आकर्षक फुले फुलली आहेत. ही लोंबकळणारी फुले सर्वांचे लक्ष वेधत आहेत. बहाव्याच्या द्राक्षांच्या झुपक्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य अनेकांना वेड लावत आहे.
सध्या जिल्ह्यात जंगल, माळरानावर व रस्त्याच्या कडेला बहाव्याच्या फुलांनी बहरलेली झाडे दिसत आहेत. ही आकर्षक फुले पाहून सर्वांचीच मने प्रफुल्लित होत आहेत. बहाव्याचा पिवळा फुलोरा अर्धा ते एक फूट लांब आणि लोंबणारे असतात. द्राक्षांच्या झुपक्यासारख्या दिसणाऱ्या या फुलांचे सौंदर्य अक्षरशः वेड लावणारे असते. अनेकांनी त्यावर कविता सुद्धा रचल्या आहेत. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष ''गोल्डन शॉवर ट्री'' म्हणूनही ओळखला जातो. बहावा हा पावसाच्या आगमनाची चाहूल देतो. फुले बहरल्यानंतर साधारण ४५ दिवसांच्या आत पाऊस सुरू होतो. एक उपयोगी व सुंदर वृक्ष म्हणून बहाव्याला ओळखले जाते. याचे शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिस्टुला’ आणि मराठी नाव बहावा व कर्णिकार आहे. संस्कृत नाव आरग्वध आहे. तर हिंदी नाव अमलतास आहे. बहाव्याचे ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले. फिस्टुला म्हणजे पोकळ नळी. बहाव्याचा वृक्ष साधारण ८ ते १० मीटरपर्यंत उंच वाढतो. पाने संयुक्तपर्णी समसंख्य असून, चार ते आठ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो. उन्हाळ्यात मात्र पिवळ्या आकर्षक फुलांनी बहरतो.

बहुपयोगी
मोठ्या खोडापासून इमारती लाकूड मिळते. बहाव्याची साल कातडी कमावण्याच्या उपयोगी आहे. शेंगेतला गर सारक औषध म्हणून उपयोगी असतो. जास्त पिवळेपणा असलेल्या काविळीत आधी मगज देतात. त्याच्या सेवनामुळे सौम्य जुलाब होऊन अन्नमार्गातले पित्त पडून जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT