मुंबई

अलिबागमध्‍ये मविआचे वर्चस्व

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २९ : अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवत झेंडा फडकावला आहे. निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्यासह सर्व उमेदवारांचा पराभव झाला. जिल्‍ह्यातील अन्य बाजार समित्यांसाठी रविवार (ता. ३०) रोजी मतदान होत आहे.
शुक्रवारी अलिबागमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १४९३ पैकी १३२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, महाविकास आघाडीने बहुसंख्य उमेदवार बिनविरोध निवडून आणून यापूर्वीच वर्चस्व मिळवले आहे; मात्र काही जागांवर शिंदे गट आणि भाजपने आपले अस्तित्व दाखवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ जागांपैकी ७ बिनविरोध; तर ११ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदारसंघात ११ जागांसाठी १३, ग्रामपंचायती मतदारसंघात ४ जागांसाठी ६, व्यापारी, आडते मतदारसंघात २ जागांसाठी ३; तर हमाल व्यापारी मतदार संघात महाविकास आघाडीचा बिनविरोध उमेदवार निवडून आला आहे. शनिवारी पार पडलेल्या मतमोजणीत ग्रामपंचायत मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भोपी यांना ५३८; तर यशवंत भगत यांना ५१८ मते मिळाली. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा कैणी आणि शैलेश पाटील यांचा दारुण पराभव झाला.
------------------
उमेदवारांचा जल्‍लोष
कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीचे सलीम तांडेल, अनंत पाटील, संजय पाटील, स्वप्नील पाटील, यशवंत भगत, अशोक म्हात्रे, कमळाकर साखळे हे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले; तर शिंदे गटाच्या नंदन पाटील आणि संदेश थळे यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. व्यापारी आणि अडत्यांच्‍या मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रतीक पाटील तसेच सुभाष वागळे यांनी विजय मिळवत शिंदे गटाचे संजय भावे यांना पराभूत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पुढील काही तास महत्त्वाचे! मुंबईसह 'या' भागात कोसळणार मुसळधार, हवामान विभागाचा अलर्ट

Jalna Unseasonal Rain : कुंभार पिंपळगाव परिसरात वादळी वारे, गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा

Pune Census News : पुणे महापालिकेचा जनगणना कर्मचाऱ्यांना इशारा : निष्काळजी प्रगणकांवर ‘जनगणना कायदा १९४८’ अंतर्गत कठोर कारवाईची तयारी

PSI Rape Case: लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार; पोलिस उपनिरीक्षक स्वदेश चव्हाणवर पुण्यात गुन्हा दाखल

NEET Paper leak: मनीषा हवालदार यांनी प्रश्नमालिकेच्या नोट्स जाळून टाकल्या; पतीच्या फोनवरुन मांढरेंना टाकले प्रश्न

SCROLL FOR NEXT