मुंबई

ओले काजूगरांना खवय्यांची पसंती

CD

पाली, १ (वार्ताहर) ः ओल्‍या काजूगराचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आवक कमी झाल्‍याने गत महिन्याच्या तुलनेत आता किमती वाढल्‍या आहेत. १५ दिवसांपूर्वी १०० ते १५० रुपये शेकड्याने मिळणारे काजूगर आता २०० ते २५० रुपयांवर गेले आहेत. किंमत वधारली असली तरी हंगाम सरत असल्याने काजूगर खरेदीसाठी खवय्यांची लगबग सुरू असल्‍याचे दिसते.
अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे यंदा काजू व आंबा पिकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. उत्पादनही घटले आहे. आदिवासी महिला हा रानमेवा विकण्यासाठी आणतात, सध्या भाव चांगला मिळत असल्याने त्‍यांनी समाधान व्यक्‍त केले आहे. माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा आदी ठिकाणी काजूगर शेकड्याने मिळतात. तर पाली, रोहा, पेण आदी ठिकाणी काजूगर वाट्यावर मिळतात. गतवर्षी १० रुपयांनी मिळणार वाटा आता २०-३० रुपयाने मिळतो. भाव जास्त असला तरी खवय्ये चढ्या भावाने काजूगर खरेदी करीत आहेत. मे महिन्यापर्यंत ओल्या काजूगराचा हंगाम सुरू असतो, काजूचे फळ तयार झाल्यावर ओले काजूगर मिळत नाहीत. काजूगर विकल्‍याने कुटुंबाला हातभार लागत असल्‍याचे ताई वाघमारे या विक्रेतीने सांगितले.

अनोखी शक्कल
फळ धारणा होण्याआधी आलेल्या बी मधून काजूगर काढला जातो. त्यानंतर फळ मोठे झाल्यावर बी परिपक्व होते. आणि ओल्या काजूगराचा हंगाम संपतो. मात्र काहीजण परिपक्व बिया पाण्याच्या मोठ्या पिंपात भिजवून ठेवतात व त्यातील गर काढून ओले काजूगर असल्याचे सांगून विकतात. ओले काजूगर आणि परिपक्व झालेल्या काजूच्या बियांमधील गराच्या चवीत खूप फरक असतो.

काजूगराचे चविष्ट पदार्थ
चविष्ट ओले काजूगर वेगवेगळ्या प्रकारे खाल्या जातात. काजूगराचा रस्सा किंवा सुकी भाजी करून खाल्ली जाते. पुलाव व बिर्याणी देखील केली जाते. तसेच मटण, मच्छी, व सुक्या मासळीमध्ये टाकल्‍यास काजूगर जेवणाची लज्‍जत वाढवतात.

काढण्यासाठी मेहनत व हातांची दुरवस्था
दुर्गम-डोंगराळ भागात, जंगलात काजूच्या बिया काढण्यासाठी जावे लागते. आदिवासी बांधव उन्हातान्हात बिया काढण्यासाठी जातात. या बियांना मोठ्या प्रमाणात चीक असतो. आदिवासी महिला व बांधव बियांमधून काजूगर काढताना हातमोजे घालत नाही किंवा कोणतीही सुरक्षितता घेत नाही. त्यामुळे त्यांचे हात व बोटे चिकामुळे पूर्णपणे खराब होतात. काहीजण राख लावतात पण त्याने काही फरक पडत नाही. शासनाकडून त्यांना हातमोजे तसेच साहाय्य करणे गरजेची असल्‍याची मागणी सुधागडातील आदिवासी नेते रमेश पवार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT