मुंबई

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून प्रबोधन अभियान

CD

पाली, ता. ३ (वार्ताहर) ः एनसीइआरटीने दहावीच्या अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान सांगणारा भाग वगळल्‍याची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली आहे. आनुवंशिकता आणि उत्क्रांती या विषयी दहावीच्या अभ्यासक्रमात असलेला भाग वगळून त्या जागी केवळ आनुवंशिकता एवढाच भाग ठेवला आहे. अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान वगळण्याच्या महाराष्ट्र अंनिस निषेध करीत आहे आणि आपला निषेध कृतीतून व्यक्त करण्यासाठी ‘चला उत्क्रांती समजून घेवू’ हे अभियान राबविणार असल्‍याची माहिती महाराष्ट्र अंनिस मार्फत डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, फारूक गवंडी, सुजाता म्हेत्रे, डॉ. संजय निटवे, वाघेश साळुंखे, डॉ. एस.के. माने, सुनील भिंगे,रवी सांगोलकर, सचिन करगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये उत्क्रांती सिद्धांत जीवशास्त्रातील मूलभूत सिद्धांत म्हणून शिकवला जातो. या पार्श्वभूमीवर उत्क्रांतीचा सिद्धांत दहावीच्या अभ्यासक्रमातून वगळल्यामुळे जे विद्यार्थी दहावीनंतर विज्ञान शाखा घेणार नाहीत, त्यांना उत्क्रांतीच्या सिद्धांताची माहिती मिळणार नाही. देशभरातील अठराशे वैमानिकांनी या गोष्टीला विरोध नोंदविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT