मुंबई

पाली-पाटणूस मार्गावरील पुलांचे काम संथगतीने

CD

पाली, ता. ५ (वार्ताहर) ः अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली ते पाटणूस राज्यमार्ग क्रमांक ९४ च्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र या मार्गातील अडूळसे, नांदगाव व रवाळजे येथे नदीवरील पुलांचे काम संथगतीने सुरू आहे. गेल्‍या दोन-तीन दिवसांपासून महाड, पोलादपूर, खालापूर परिसरात वादळी वाऱ्याने अनेक घरांचे नुकसान केले आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्‍यामुळे केव्हाही जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मात्र पुलाची कामे अपूर्ण असल्‍याने अतिवृष्‍टी झाल्‍यास परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्‍यता आहे.
रवाळजे आणि नांदगाव येथील पुलाच्या भिंतीचे काम पूर्ण आहे तर अडूळसे येथील नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी पूल आणि रस्त्याला जोडणारा भाग अद्याप अपूर्ण आहे. त्याचप्रमाणे नांदगावमधील पुलाचे कामही बाकी असून स्लॅब कधी टाकणार, त्‍याशिवाय संरक्षक भिंत उभारता येणार नसल्‍याने पावसाळ्यात काम रखडण्याची शक्‍यता आहे. सध्या घाईघाईने काम पूर्ण करण्याच्या प्रयत्‍नात कंत्राटदार असून त्‍यामुळे पुलाच्या दर्जावर ग्रामस्‍थांकडून प्रश्‍न उपस्‍थित होत आहेत.

रोजगार, शाळा बुडणार
पाली ते अतोणे भागातील अनेक नागरिक नोकरी-व्यवसायासाठी तर महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने पाली येथे दररोज ये-जा करतात. मात्र पुलाचे काम पूर्ण न झाल्‍याने परिसरातील ५० गावांचा संपर्क तुटण्याचा शक्‍यता निर्माण झाला आहे. या मार्गावरून विळेमार्गे पुणे तर माणगाव-कोलाडमार्गे कोकणात जाता येते. पुलांचे काम पूर्ण न झाल्यास येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होईल.

पाली-पाटणूस राज्य मार्गावरील पुलांचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. आता पावसाळाजवळ आल्यानंतर घाईघाईने काम उरकण्यात येत असल्‍याने सुरक्षेबाबत तडजोड करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्‍न सुरू आहे. त्‍यामुळे एखादी दुर्घटना झाली तर त्‍याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे.
- अमित निंबाळकर, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, सुधागड


रवाळजे, नांदगाव येथील पुलाचे काम लांबले आहे. याठिकाणी कामगार टिकत नसल्‍याने काम रखडले आहे. परंतु येत्या काही दिवसांत सर्व पुलांचे काम पूर्ण करून लवकरात लवकर वाहतुकीस खुले करण्याचा प्रयत्‍न आहे.
- रवींद्र मजकूरी, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

पाली ः नांदगाव येथील पुलाचे काम अपूर्ण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT